पारनेर:-एम इ टी इंग्लिश स्कूल सुपा या ठिकाणी वन विभाग यांच्यावतीने मानव बिबट संघर्ष निवारण या कार्यशाळेचे आयोजन.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

एम इ टी इंग्लिश स्कूल सुपा या ठिकाणी वन विभाग यांच्यावतीने मानव बिबट संघर्ष निवारण या कार्यशाळेचे आयोजन.

पारनेर,सुपा – राजकुमार इकडे (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील सुपा एम इ टी इंग्लिश स्कूल या ठिकाणी वन विभाग यांच्यावतीने मानव बिबट संघर्ष निवारण कार्यक्रम या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.माननीय धर्मवीर साल विठ्ठल साहेब उपसरक्षक अहिल्यानगर यांनी जी व्ही धोंडे वनपरिक्षेत्र अधिकारी पारनेर प्रादेशिक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व विद्यालयांमध्ये बिबट जागृती व करावयाचा उपयोग योजना संदर्भात अजिंक्य भांबुरकर, संचालक वाइल्डलँड्स कन्झर्वेशन फाउंडेशन यांची माहिती देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अजिंक्य भांबुरकर, संचालक वाइल्डलँड्स कन्झर्वेशन फाउंडेशन यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले की बिबट्या प्रणव क्षेत्रात एकट्याने प्रवास न करता दोन किंवा अधिक लोकांनी सोबत राहावे मोठ्याने बोलत जावे म्हणजे बिबट्याला तुमची चाहूल कळेल. अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा बिबट्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या त्याला डीवाचण्याचा प्रयत्न करू नका तात्काळ वन विभागाला कळवा, रात्री एकटे फिरताना जवळ टॉर्च किंवा काठी बाळगा. संध्याकाळच्या वेळेस घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान लहान मुलांना एकटे सोडू नका घडलेल्या घटनांमध्ये लहान मुले, स्त्रिया यांच्या बाबत रात्रीचे वेळेस संघर्ष झालेला आहे. याबाबत विशेष खरबदारी घ्यावी.
त्यानंतर नियत क्षेत्राधिकारी पठाण साहेब पारनेर यांनी आपले विचार मांडले ते म्हटले की परिसरातील लोकांनी व मुलांनी काळजी घ्यावी पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावे संध्याकाळी पाच नंतर व सकाळी सात पर्यंत बिबट जास्त सक्रिय असतो शेतात काम करणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी सावधगिरी बाळगावी रस्त्याच्या कडेचा गाडी झुडपे ग्रामपंचायत माध्यमातून साफसफाई करण्यात यावी. बिबट प्रमाण क्षेत्रात सावधगिरीने राहावे. गोठे बंदिस्त ठेवावे घराचा परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून घराजवळ येणार नाही अशा प्रकारे काही उपाययोजना करून काळजी घ्यावी. त्यावेळी कार्यक्रमास नियत क्षेत्राधिकारी पठाण साहेब , संस्थेच्या एम.ई.टी. शाळेच्या प्राचार्या सौ. मोनाली पठारे, स्कायडेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. अनिता शर्मा, तसेच समन्वयक सौ. सरिता पांचे या मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप गायकवाड सर यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले,आदी उपस्थित होते.




