कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यातील ५१४ तलाठी व १११ महसूल अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा व काम बंद आंदोलन सुरू ….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

साताऱ्यातील ५१४ तलाठी व १११ महसूल अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा व काम बंद आंदोलन सुरू ….

सातारा दि: महाराष्ट्राच्या विधिमंडळातील हिवाळी अधिवेशन संपताच महसूल विभागातील तलाठी व अधिकारी वर्गाने राज्यव्यापी सामुदायिक रजा व काम बंद आंदोलन सुरू केले. यामुळे सातारा जिल्ह्यात महसुली कामकाज ठप्प झाले आहे.

महसूल विभाग हा लाड़की बहिण योजना, एकाईस ,नैसर्गिक आपत्ती, पी एम किसान योजना , सर्व प्रकारचे दाखले, मतदार नोंदणी, सर्व प्रकारच्या निवडणुका, ऍग्री स्टॅक, पुरवठा,
राजशिष्टाचार, विविध आयोग दौरे, संजय गांधी योजना यासारखी बिगर महसूली कामे महसूली
कामकाजासोबतच पूर्ण ताकदीने केली जात आहेत.
नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी
विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना आपण नैसर्गिक न्याय तत्वानुसार महसूल विभागाला संधी न देता
कोणताही दोष नसताना गौण खनिज प्रकरणात ४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी व २ ग्राम
महसूल अधिकारी अशा दहा जणांवर यांना अन्यायकारक पद्धतीने अचानक विधान सभेत निलंबित कारवाई केली आहे.
मात्र या प्रकरणी संबधित अधिकारी यांनी वेळोवेळी गौण खनिज उत्खननाबाबत
आढळून आलेल्या वस्तूस्थिती नुसार नियमोचित कार्यवाही पार पाडलेली असून शासनाच्या महसूलाचे नुकसान केलेले नाही. तसेच या प्रकरणाबाबत वरीष्ठ कार्यालयास देखील वेळोवेळी वस्तूस्थिती दर्शक अहवाल संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी सादर केलेले आहेत.
महाराष्ट्र ज़मीने महसूल अधिनियम
खनिज अवैध उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्यासाठी दंड करण्याचे अधिकार आहेत. या१९६६ नुसार महसूल अधिकारी यांना गौण
कामामध्ये ग्राम महसूल अधिकारी पासून ते उपविभागीय अधिकारी पर्यंत सर्व अधिकारी व
• कर्मचारी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना जीवाची बाजी लावून, रात्री अपरात्री कारवाई करत असतात. यामध्ये अनेकदा महसूल अधिकारी – कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले झालेले आहेत.अशा परिस्थितीत यापूर्वी वारंवार मागणी करूनही

शासनाकडून याबाबत कोणतीही ठोस
उपाययोजना होत नाही. उलट दुर्दैवाने गौण खनिज चोरीबाबत महसूल अधिकारी कर्मचारी
यांना प्राथमिकरीत्या जबाबदार धरले जाते.

महसूल अधिकारी यांना अन्यायकारक पद्धतीने अचानक विधान सभेत निलंबित केल्यामुळे महसूल विभागात फार मोठा आक्रोश निर्माण झाला असून यामुळे आमचे नीतिधैर्य खचले आहे.महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी पासून अपर जिल्हधिकारी यांचेपर्यंत यामुळे तीव्र स्वरुपात प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी अन्यायकारक पद्धतीने झालेले निलंबन तात्काळ रद्द करून या अधिकारी-कर्मचारी यांना सन्मानाने पूर्वपदावर पदस्थापना देईपर्यंत राज्य संघटनेच्या
निर्देशानुसार दिनांक 16 व 17 डिसेंबर रोजी सर्व अधिकारी/कर्मचारी सामुहिक रजेवर जात आहोत. असे निवेदनात नमूद केले असून या निवेदनाच्या प्रती सातारचे अपर जिल्हा अधिकारी मलिकार्जुन माने यांना दिले आहे. यावेळी तहसीलदार समीर यादव, हनुमंत कोळेकर, बाई माने , सोनाली मिटकरी प्रशांत जाधव ,संजय कांबळे, गणेश कारंडे संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पारवे, उपाध्यक्ष सुहास अभंग, पुणे विभाग उपाध्यक्ष प्रशांत पवार, अमोल बोबडे, . रुपेश शिंदे, अमोल चव्हाण, राजेंद्र लेंभे, अशोक तारळे कर, श्रीमती बाबर निंबाळकर श्रीमती कणसे, कुंभार, अनिल पाटील, अशोक तारळेकर, धायगुडे, अनिल पाटील, शिल्पा गोरे, शिवकुमार निमकर, नवघणे सी.एम. धनवडे, हनुमंत नागरवाड विजय पाटणकर यांचे जाधव अक्षय शिंदे डी एस कांबळे युवराज गायकवाड व महिला महसूल अधिकारी, सातारा जिल्हा तलाठी संघ, सहभागी झाले होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button