साताऱ्यात महसुली कामासाठी नवीन लॅपटॉप व प्रिंटर देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवेदन.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

साताऱ्यात महसुली कामासाठी नवीन लॅपटॉप व प्रिंटर देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवेदन.

सातारा दि: महाराष्ट्र राज्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी लिपिक यांच्यासाठी नादुरुस्त व कालबाह्य आयटी उपकरणांच्या बदल्यात नवीन लॅपटॉप व प्रिंटर
कम स्कॅनर उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाला वारंवार कळवून सुद्धा मागणीची पूर्तता न झाल्याने आज सातारा जिल्ह्यात महसुली कामासाठी नवीन लॅपटॉप व प्रिंटर देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदन दिल्याची माहिती सातारा जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पालवे यांनी दिली आहे.
उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सातारा जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी हे ग्रामस्तरावर महसूल
प्रशासनाची मुख्य जबाबदारी सांभाळत आहेत . नागरिकांना तातडीच्या सेवा ई-
फेरफार, ई-हक्क, ई-पिक पाहणी, सातबारा वाटप, तसेच नवीन ई-पंचनामा प्रणाली
निरंतर आणि कार्यक्षमतेने प्रदान करण्यासाठी संगणकीकृत साधनसामग्री अत्यावश्यक आहे.
जिल्ह्यातील बहुसंख्य ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकडे सन
१०१६ ते २०१९ दरम्यान उपलब्ध झालेले लॅपटॉप व प्रिंटर आहेत. तसेच सदर लॅपटॉप व प्रिंटर कालबाह्य झालेले असून७/१२ ८अ व फेरफार यांच्या नक्कल वितरणाची ठरवून दिलेली फी
ही ग्राम महसूल अधिकारी दरमहा शासन जमा करत आहेत. शासन निर्णय दि. १/८/२०११
नुसार अशा आयटी उपकरणांचे आयुष्यमान ५ वर्षे इतके निश्चित करण्यात आले आहे.
तेव्हापासून आजपर्यंत ६ ते ९ वर्षांचा कालावधी लोटलेला असून बहुतांश उपकरणे पूर्णतःकालबाह्य, नादुरुस्त व निकृष्ट अवस्थेत आहेत. काही उपकरणे चालू असली तरी त्यांची
सिस्टम व्हर्जन, स्पीड व क्षमता ही अद्ययावत शासन प्रणालींच्या किमान निकषांनाही पूरक
नाही. त्यांची कार्यगती इतकी कमी आहे की ई-फेरफार, ई-हक्क, ई-पिकपाहणी, ई-पंचनामा यांसारख्या सुधारीत प्रणालींवर काम करणे
व्यावहारिकदृष्ट्या अशक्य झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीतील नोंदी करणे, प्रस्ताव
मंजूर करणे व आवश्यक सेवा वेळेत देणे अशक्यप्राय झाले आहे. ही स्थिती ई-शासन
प्रणालीवरील शासनाच्या विश्वासार्हतेलाही तडा पोहोचवणारी आहे. याबाबत सातारा जिल्ह्यातील महसूल कर्मचारी वर्गामध्ये तीव्र असंतोष व मानसिक आरोग्यावर परिणामझाला आहे.
कालबाह्य व नादुरुस्त उपकरणांवर काम करणे म्हणजे कर्मचाऱ्यांना अक्षरश गतिमान सरकार मध्ये काम करताना
गंजलेल्या तलवारीने लढाई लढण्यास ” लावणे असा प्रकार उघड झाला आहे. अधिकाऱ्यांकडून झालेल्या प्रचंड
कामकाजाच्या ताणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव, असंतोष आणि शासनाबद्दल तीव्र नाराजी वाढलेली आहे. नादुरुस्त साधनांसह प्रचंड कार्यभार पूर्ण करण्याचा ताण
कर्मचाऱ्यांमध्ये असहाय्यता, मानसिक ताण, शासनाविषयी तीव्र असंतोष पसरला आहे. नवीन भरतीतील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना ६-७ महिने लोटूनही अद्यापही संगणकीय साधने उपलब्ध नाहीत. यामुळे क्षेत्रीय कामकाज ठप्प असून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा गंभीररित्या बाधित होत आहेत.
इ) शासन निर्णय असूनही खरेदी प्रक्रिया पोर्टलद्वारे खरेदीस शासनस्तरावर मंजुरी असूनही प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया
रखडलेली आहे . हा विलंब शासनाच्या स्वतःच्या धोरणाचे उल्लंघन आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाकडून व त्यास अनुसरून सातारा जिल्हा तलाठी
संघाने अनेकवेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जमाबंदी आयुक्त पुणे यांना निवेदन देताना १५ नोव्हेंबरपर्यंतसाधने न मिळाल्यास ऑनलाइन कामकाज बंद करण्याचा इशारा दिलेला होता. सदर
भेटीमध्ये मा.जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी दि. 27/10/2025 रोजी निविदा प्रक्रीया पूर्ण होऊन अद्यापपावेतो पुढील कुठलीही कार्यवाही होत नसल्याने
जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांचा दबाव पाहता नाईलाजाने दि. १५ डिसेंबर पासून सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी आपापली डी सी एस
तहसील कार्यालयात जमा करून ऑनलाईन कामकाज पूर्णतः बंद करुन आंदोलनास प्रारंभकेला आहे.यामुळे सर्व ऑनलाइन कामकाज पूर्णतः बंद राहील, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होईल.
म्हणून विनंती नसून ठाम मागणी करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार नवीन लॅपटॉप व प्रिंटर ची GeM पोर्टलद्वारे खरेदी प्रक्रिया
तात्काळ सुरू करून सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना ते तातडीने
उपलब्ध करून द्यावेत.
२) कालबाह्य उपकरणांच्या विल्हेवाट प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यात यावी. असे स्पष्ट केले आहे. या निवेदनावर सातारा जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत पारवे, पुणे विभाग उपाध्यक्ष प्रशांत पवार उपाध्यक्ष सुहास अभंग सरचिटणीस उमरसिंग परदेशी रुपेश शिंदे अमोल चव्हाण हनुमंत नागरवाड विजय पाटणकर यांचे जाधव अक्षय शिंदे डी एस कांबळे युवराज गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व तलाठी या आंदोलनात सहभागी झाले असून सातारा जिल्ह्यातील वाई पाटण कराड कोरेगाव येथील तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील ५१४ तलाठी व १११ महसूल अधिकारी सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली.




