आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्याला वाढत्या प्रदूषणाचा धोका ; आरोग्यावर परिणाम.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

साताऱ्याला वाढत्या प्रदूषणाचा धोका ; आरोग्यावर परिणाम.

सातारा दि: छत्रपतींची राजधानी व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश ज्या नगरीत झालेला आहे. त्यात साताऱ्याला वाढत्या प्रदूषणाचा धोका निर्माण झालेला आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला असला तरी त्याबाबत कोणालाही सोयरसुतक नसल्याचे चिंताजनक बाब पुढे आली आहे. याबाबत आता सामाजिक उठाव होणे गरजेचे आहे.
सातारा नगरपालिकेची हद्द वाढ झाली असली तरी नागरिकांच्या आरोग्याबाबत नागरी सुविधा देण्यामध्ये कोणतेही वाढ झालेली नाही. याचा परिणाम आता सर्वजण भोगत आहे. दूषित वातावरणामुळे खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्राला अच्छे दिन आले आहेत. हे नाकारून चालणार नाही. पण गोरगरीब सामान्य माणसांना आरोग्याच्या बाबतीत बुरे दिनाशी सामना करावा लागत आहे.
सातारा शहरातील वाढत्या प्रदूषणाला सामाजिक उत्साहांसोबतच वाढत्या वाहन संख्येमुळे हवेतील ऑक्सिजन कमी होत आहे. उद्योग आणि बांधकामामुळे हवेत धूळ व धूर वाढत आहे. वार्तानुकूलित केबिनमधील प्रदूषण नियंत्रण महामंडळाला मर्यादा पडू लागलेले आहेत. प्रदूषण वाढले असले तरी त्यावर नियंत्रण आणणारी यंत्रणा काम करत नाही. जिथे हवेचे मोजमाप करणारे यंत्र बंद पडलेली आहे. तिथे महामंडळाकडून अपेक्षा काय करणार? असे नागरिक बोलू लागलेले आहेत.
साताऱ्यात सेकंड हॅन्ड वाहनांची वाढती संख्या त्यातून निघणारा धूर आणि रासायनिक उद्योगातून झालेले पाण्याचे प्रदूषण लोकांच्या जीवाशी खेळ करत आहे. औद्योगिक कचरा आणि बांधकाम प्रकल्पांमुळे हवेत धूळ आणि हानिकारक कण मिसळत आहेत. त्याबाबत प्रदूषण महामंडळाला कारवाईचे अधिकार आहेत. पण, कारवाई होत नाही. अयोग्य कचरा व्यवस्थापनामुळे हवा आणि पाणी प्रदूषित होत आहे. याचा परिणाम आता शहरातील मध्यमवर्गीय वस्तीत सुद्धा होत आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये रॉ मटेरियल मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे त्याबाबत अधिक भाष्य करण्यास टाळाटाळ केली जाते. असाही आरोप होत आहे.
श्वसनाचे आजार, फुफ्फुसांचे विकार आणि हृदयविकार वाढत आहेत.
हवेतील सूक्ष्म कण (PM2.5) धोकादायक पातळीवर पोहोचले आहेत. यावर मानवी उपाय म्हणजे रहदारीच्या रस्त्यावर सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवा, वृक्षारोपण करा, औद्योगिक प्रदूषण नियंत्रणात आणा, प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करा. याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. याबाबत नुसत्या बैठका घेणे हिताचे ठरणार नाही.
सातारा शहराची हवा गुणवत्ता (AQI) बऱ्याचदा चांगली (उत्तम श्रेणी) असते, पण सार्वजनिक उत्सव आणि व्यक्ती पूजक नेत्यांसाठी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण, वार्षिक यात्रा यातूनही प्रदूषण होत आहे. सार्वजनिक चौक परिसरात धुळीचे प्रदूषण वाढले आहे, ज्यामुळे श्वसनाचे त्रास होऊ शकतात. एकूणच, सातारा शहरात वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या आहे,
अतिसूक्ष्म घन व द्रव कण हे २.५ मायक्रोमीटर्सहून कमी व्यास असलेले हुंगले जाणारे प्रदूषणकारक कण शरीरात प्रवेश करतात. जे फुफ्फुसे आणि रक्तप्रवाहामध्ये बाधा आणू शकतात. ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या होऊ शकतात. सर्वात गंभीर परिणाम फुफ्फुसे आणि हृदयावर होतात. संसर्गाच्या परिणामी खोकला आणि श्वास घेण्यात अडचण, वाढलेला दमा आणि जुनाट श्वसनाच्या आजाराचा विकास होत आहे.

नायट्रोजन डायऑक्साइडच्या उच्च पातळ्यांमध्ये श्वास घेतल्यामुळे श्वसनाच्या समस्यांची जोखीम वाढते. खोकला आणि श्वास घेण्यात अडचण हे सामान्य आहेत आणि दीर्घकालीन संसर्गामुळे श्वसनातील बाधांसारख्या आरोग्याच्या अधिक गंभीर समस्या होऊ शकतात. याची सार्वत्रिक माहिती देणे गरजेचे बनलेले आहे.
गेल्या आठवड्यामध्ये वाढत्या थंडीमुळे अनेकांना उबदार कपडे घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परंतु वाऱ्याच्या झोकामुळे अनेकदा बारीक बारीक कण हे उबदर कपड्यात अडकून ते झाडल्यानंतर त्याचाही परिणाम घरातील लहान बालकांवर होत आहे. याबाबत ही काळजी घेणे गरजेचे आहे. एकूण साताऱ्यातील वाढत्या प्रदूषणाच्या समस्या कडे आता सामाजिक प्रश्न म्हणून बघणे गरजेचे आहे. असे मत रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र नेते रमेश उबाळे, डॉ. अरुण माने व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी सांगितले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button