दौंड:-(पुणे)-जावजी बुवाची वाडी- आमरण उपोषणाला सुरुवात; दलित समाजाच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्र.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

दौंड:-जावजी बुवाची वाडी- आमरण उपोषणाला सुरुवात; दलित समाजाच्या महत्त्वाच्या मागण्यांसाठी आंदोलन तीव्र.
दिनांक 10 डिसेंबर 2025, पुणे–सोलापूर रोड, तालुका दौंड (जि. पुणे) येथे दलित समाजाच्या मूलभूत सुविधा आणि सुरक्षेशी संबंधित विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
या उपोषणामध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाऊ शेंडगे व जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका महिला अध्यक्षा सारिका ताई भुजबळ सहभागी झाले आहेत.
उपोषणकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत—
कालव्यावरील पूल तातडीने बांधून देण्यात यावा. कालव्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिक घसरून पडून गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या असून भविष्यातील अनर्थ टाळण्यासाठी किमान 10 फूट लोखंडी जाळी बसविण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत कासुर्डी येथील दलित समाजातील पाडण्यात आलेल्या घरांची पुनर्बांधणी करून देण्यात यावी.
तोडफोड झालेली पाईपलाईन त्वरित दुरुस्त केली जावी.
पाटबंधारे विभागाने पूर्वीप्रमाणे रस्ता दुरुस्त करून मूळ स्थितीत आणावा.
वरील सर्व मागण्यांसाठी अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. राणीताई भंडवलकर यांनी लिखित स्वरूपात पाठिंबा दर्शविला आहे.
या सर्व मागण्या न्याय्य असून तातडीने दखल घेऊन निर्णय करावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात येत असून परिसरात या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन



