क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

दुबई:-‘इंडिया प्रॉपर्टी शो’मध्ये दुबईतील NRI उद्योजक, उद्योगपती आणि व्यावसायिकांसोबत ‘महाBiz 2026’ निमीत्त विशेष संवाद, व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

‘इंडिया प्रॉपर्टी शो’मध्ये दुबईतील NRI उद्योजक, उद्योगपती आणि व्यावसायिकांसोबत ‘महाBiz 2026’ निमीत्त विशेष संवाद, व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

दुबई, १० डिसें, प्रतिनिधी : भारत, GCC, MENA आणि आफ्रिका येथील उद्योजकांना एका व्यासपीठावर आणणाऱ्या UAE-स्थित GMBF Global या नॉन-प्रॉफिट व्यावसायिक मंचाने अलीकडे दुबईतील NRI उद्योजक, उद्योगपती आणि व्यावसायिकांसोबत संवाद साधला. नुकताच आयोजित केलेल्या या विशेष सत्रात GMBF Global चे अध्यक्ष डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांनी व्यापार, उत्पादन, रिअल इस्टेट, तंत्रज्ञान आणि सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये भारतीय उद्योगांसाठी UAE मध्ये झपाट्याने वाढणाऱ्या संधींचा ठळक आढावा घेतला.

‘इंडिया प्रॉपर्टी शो’ दरम्यान झालेल्या या परस्परसंवादात GMBF ग्लोबलच्या नेतृत्वाचे मार्गदर्शन, महाBiz रोडशोजना मिळालेला जागतिक प्रतिसाद तसेच ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबईत होणाऱ्या महाBiz 2026 या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक महापरिषेदेबद्दल वाढत चाललेली उत्सुकता मांडण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक विकसकांनी व प्रदर्शनकर्त्यांनी या परिषदेत प्रतिनिधी किंवा प्रायोजक म्हणून सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.

जागतिक रोडशो निष्कर्षांचा आढावा
सत्रात GMBF ग्लोबल अॅडव्हायझरी बोर्डातील सदस्यांनी विविध देशांतील रोडशोचे ठळक निष्कर्ष सादर केले:

डॉ. साहित्य चतुर्वेदी यांनी लंडन (UK) रोडशो मधील प्रतिसाद मांडताना तंत्रज्ञान कंपन्या, सल्लागार आणि व्यावसायिक UAE मध्ये विस्तार करण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.

CA संजय गगरानी यांनी सिडनी (ऑस्ट्रेलिया) सत्राचे महत्त्वाचे मुद्दे सांगितले. ऑस्ट्रेलियन कंपन्या UAE सोबत भागीदारी, संयुक्त उपक्रम आणि बाजार विस्तार याविषयी वाढते आकर्षण दाखवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आरजे रोनक कोठेचा यांनी Times of Dubai (ToD) सोबतच्या आगामी मीडिया सहयोगाची माहिती दिली, ज्यामुळे महाBiz 2026 चा प्रचार UAE मधील प्रभावी व्यावसायिक व जीवनशैली समुदायापर्यंत पोहोचणार आहे.

या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून श्री याकूब अल अली यांनी उपस्थिती लावली. त्यांनी UAE–भारत व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी GMBF Global च्या उपक्रमांचे कौतुक केले आणि दुबईच्या जागतिक व्यावसायिक केंद्राच्या अनोख्या स्थानाचा लाभ घेण्याचे आवाहन उपस्थित उद्योगपतींना केले.

महाBiz 2026 : जागतिक व्यावसायिकांना जोडणारे प्रभावी व्यासपीठ
महाBiz 2026 मध्ये १५ पेक्षा जास्त देशांतील ८००+ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. B2B नेटवर्किंग, संयुक्त व्यवसाय उपक्रम, निर्यात-विक्री भागीदारी, गुंतवणूक चर्चा आणि ज्ञान देवाणघेवाण असे अनेक महत्त्वाचे विभाग या परिषदेत असणार आहेत.
परिचर्चेची थीम — “Contacts to Contracts” — उद्योजकांना प्रत्यक्ष, ठोस आणि सीमा ओलांडणाऱ्या व्यावसायिक संधींशी जोडणारे सार सांगते.

GMBF Global विषयी
GMBF Global (Gulf Maharashtra Business Forum) ही दुबईस्थित नॉन-प्रॉफिट संस्था असून UAE, GCC, भारत, आफ्रिका आणि इतर जागतिक बाजारांमध्ये व्यापार, गुंतवणूक आणि व्यावसायिक भागीदारी मजबूत करण्यासाठी कार्यरत आहे. मागील दशकभरात या मंचाने सहकार्य, वाढ आणि जागतिक विस्तार यावर आधारित सकस व्यावसायिक समुदाय उभारला आहे.

सत्राच्या शेवटी डॉ. सुनील व्ही. मांजरेकर यांनी सर्व उपस्थितांना GMBF Global चे सदस्य होण्याचे आवाहन केले, जेणेकरून दोन दिवस चालणाऱ्या ‘महाBiz 2026’ या भव्य व्यावसायिक मेळाव्यात ते प्रत्यक्ष सहभाग नोंदवू शकतील.

अधिक माहितीसाठी : www.mahabiz2026.com
मीडिया संपर्क : mahabiz2026@gmbfglobal.com

PR : RAM PUBLICITY, राम कोंडिलकर

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button