पुसेसावळी:-खटाव तालुक्यातील केंद्रशाळा कळंबीने साधला तीन पिढ्यांचा त्रिवेणी संगम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

खटाव तालुक्यातील केंद्रशाळा कळंबीने साधला तीन पिढ्यांचा त्रिवेणी संगम.

पुसेसावळी:-खटाव तालुक्यातील केंद्रशाळा कळंबीने
एक अनोखा उपक्रम घेत तीन पिढ्यांचा त्रिवेणी संगम साधला. तरुण पिढी मध्ये संस्कार, आदरभाव कमी झाल्याचे सगळीकडे दिसत आहे त्यामुळे संस्कारक्षम मूल्यधिष्टीत, पिढी निर्मितीचे काम प्राथमिक स्तरावर होणे गरजेचे आहे, लहान वयात झालेले संस्कार कायमस्वरूपी टिकतात म्हणून केंद्रशाळा कळंबी येथे आजी आजोबा दिवसाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रम संदीप काळे, अमीर मुलाणी, रामदास पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनाजी ढोले मुख्याध्यापक धनाजी थोरवे, राजेंद्र खोपडे नवनाथ जाधव, दिपक पावरा कल्याणी भोसले व सर्व मुलांचे आजी आजोबा उपस्थित होते.
शाळेच्या प्रवेशद्वारापासून सर्व उपस्थित आजी आजोबा यांना फुलांचा वर्षाव करून शाळेच्या क्रीडांगणावर वाजत गाजत आणले. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात केली अतिशय भावपूर्ण वातावरणामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित आपापल्या आजी आजोबांना, आई वडील यांना पाटावरती बसून त्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या पायावरती हळदी कुंकू,फुले वाहिली त्यानंतर त्यांनी आणलेले टॉवेल टोपी ब्लाऊज पीस नारळ आपल्या आजी आजोबांना दिले व त्यांच्या आशीर्वाद घेतले.
दरम्यान काही उपस्थित असणाऱ्या आजोबांनी माता पित्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजी आजोबांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या स्मरणात कायमस्वरूपी टिकून राहणार असून आजी आजोबा व नातवंड यांच्यात प्रेमाच सलोख्याच नाते घट्ट होणार असल्याचे काही आजोबांनी भावना व्यक्त केले. आजी,आजोबा त्यांची मुले आणि नातवंडे असा तीन पिढ्यांचा हा सोहळा म्हणजे जणू त्रिवेणी संगमच होता. यानंतर सर्व आजींसाठी संगीत खुर्ची हा मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन केल्यामुळे आजींही मोठ्या संख्येने खेळात भाग घेतला.. विजेत्या आजींना बक्षीस देण्यात आले बऱ्याच दिवसांनी लहान होता आल्याचे आणि कौटुंबिक कामामुळे जीवनात आनंद घेता येत नव्हता पण या उपक्रमामुळे या सगळ्यापासून सुटका घेऊन आनंदाचे क्षण घेता आल्याचे समाधान मिळाल्याचे काहींनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कळंबी केंद्राचे केंद्रप्रमुख धनाजी पवार, मुख्याध्यापक धनाजी थोरवे, राजेंद्र खोपडे, नवनाथ जाधव, दीपक पावरा कल्याणी शिंदे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांनी सहकार्य केले सूत्रसंचलन राजेंद्र खोपडे, व दीपक पावरा यांनी केले आभार संदीप काळे यांनी मानले
चौकट
शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणवत्तेबरोबर सर्वांगीण विकास साधण्यासाठी वेगवेगळे उपक्रम साजरे केले जातात. आशा उपक्रमात पालक ग्रामस्थ यांचा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधला जातो.
धनाजी थोरवे मुख्याध्यापक कळंबी.




