मालाड:-(मुंबई)-रोबोटिक राज्यस्तरीय स्पर्धेत जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव शाळेने पटकावला प्रथम क्रमांक.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

रोबोटिक राज्यस्तरीय स्पर्धेत जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव शाळेने पटकावला प्रथम क्रमांक.
दिनांक सात डिसेंबर 2025 रोजी व्हेटी इंटरनॅशनल स्कूल मालाड येथे झालेल्या राज्यस्तरीय रोबोटिक स्पर्धेमध्ये जयराम स्वामी विद्या मंदिर वडगाव च्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत असे यश संपादन केले.
राज्यस्तरीय रोबोटिक स्पर्धेत वडगाव जयराम स्वामी येथील जयराम स्वामी विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला मुंबई विभागामार्फत मालाड येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये या स्पर्धा रविवारी झाल्या या स्पर्धेत सीनियर गटातून मुंबई विभागातील विविध जिल्ह्यातून 35 संघानी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत जयराम स्वामी विद्या मंदिराच्या सिद्धेश्वर मगर, रुद्र होनराव, आणि अवधूत सपकाळ यांनी उत्कृष्ट तयारीच्या जोरावर दमदार सादरीकरण केले स्पर्धेसाठी दिलेले कार्य अवघ्या दोन मिनिटे 30 सेकंदात पूर्ण करून मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकावला दिल्ली येथे पुढील वर्षी 16 ते 18 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना अटल विभागाचे प्रमुख शहाजी घार्गे, मंगेश घार्गे, यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉक्टर विकास घार्गे, उपाध्यक्ष अंकुश घार्गे, सचिव अरुण जाधव, सहसचिव दीपक थोरात, सिदोजीराव घार्गे, संतोष घार्गे यांनी अभिनंदन केले.




