मायणी:-(खटाव)-प्रा.राजाराम माने यांच्या संशोधन प्रयोगशाळेची विक्रमी नोंद.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

प्रा.राजाराम माने यांच्या संशोधन प्रयोगशाळेची विक्रमी नोंद.

एका वर्षात वीस संशोधन लेख जर्नलमध्ये प्रकाशित.
मायणी प्रतिनिधी ———————-
मायणी ता. खटाव गावचे सुपुत्र व सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. राजाराम सखाराम माने यांच्या संशोधन प्रयोगशाळेने यावर्षी उल्लेखनीय यश मिळवत एका वर्षात तब्बल वीस संशोधन लेख स्कोपस- सूचीबद्ध नियतकालिकांमध्ये प्रकाशित करण्याचा अभूतपूर्व विक्रम नोंदविला आहे.
उत्कृष्ट संशोधनकार्य, सातत्यपूर्ण अभ्यास, तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्व क्षमता यांच्या जोरावर प्रा. राजाराम माने यांनी आजवर मिळविलेल्या एकूण संशोधन कामगिरीत मोठी भर पडली आहे .सध्या त्यांचा एच इंडेक्स ७० ,एकूण १८३०७ उद्धरणे (सायटेन्शन्स ) तसेच आयटेन- इंडेक्स ३२२ असा प्रभावी शैक्षणिक दर्जा असून हे त्यांच्या संशोधन क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाचे द्योतक आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील कॅम्पस मध्ये इतक्या उच्च दर्जाचे प्रेरणादायी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले संशोधक आणि मार्गदर्शक कार्य करीत असल्याचा सर्वांना अभिमान आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील संशोधन गटाने केलेली ही कामगिरी विद्यापीठाच्या संशोधन परंपरेला नवी दिशा देणारी ठरली आहे.
विद्यापीठ प्रशासनाकडून कुलगुरू डॉ.मनोहर चासकर , प्र.कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ.डी.डी.पवार, अधिष्ठाता डॉ. एम के पाटील, डॉ. डी.एम.खंदारे , डॉ.पराग खडके, डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्राध्यापक राजाराम माने आणि त्यांच्या संपूर्ण संशोधन टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन



