बारामती:-आज बारामती मध्ये राज्य पुरस्कार पूर्व तयारी चाचणी शिबिरास सुरुवात.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

आज बारामती मध्ये राज्य पुरस्कार पूर्व तयारी चाचणी शिबिरास सुरुवात.

आज बारामती मधील नटराज नाट्य कलादालन येथे स्काऊट गाईड चाचणी शिबिरास सकाळी नियोजित वेळेनुसार स्काऊट गाईड ध्वजारोहणाने सुरुवात झाली. नंतर बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास सुरुवात झाली सदर शिबिरास बारामती तालुक्यातील सात शाळा मधून ५० स्काऊट व 22 गाईड 10 युनिट अधिकारी व इतर चार युनिट अधिकारी उपस्थित होते.शिबिर प्रमुख म्हणून संस्था सचिव सोनवणे सर व सहाय्यक म्हणून लक्ष्मण निवृत्ती थोरात व नबाब एम एन तसेच बांगर सर व तांबोळी सर व कार्यालयीन लिपिक वैष्णवी मॅडम यांनी शिबिर यशस्वी होण्यास सर्वांनी केले.
आज प्रथम दिवशी शिबिरामध्ये प्रार्थना झेंडा गीत राष्ट्रगीत स्काऊट नियम वचन ध्येय यांच्या तोंडी व लेखी परीक्षा घेण्यात आल्या. तसेच गणवेशाचे परीक्षण झाले व ध्वजारोहण पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.दुपारी सत्रात गाठी व बांधण्याचा सराव करण्यात आला. तसेच कृतीयुक्त गाणी आरोळ्या यांचा सराव करण्यात आला.




