विटा:-(सांगली)-“भयंकर आगीतून लोकांचे प्राण वाचवणारा ‘विट्याचा वीर’ — होमगार्ड लखन भुमकर यांचा शिवप्रताप संस्थेच्या वतीने गौरव.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“भयंकर आगीतून लोकांचे प्राण वाचवणारा ‘विट्याचा वीर’ — होमगार्ड लखन भुमकर यांचा शिवप्रताप संस्थेच्या वतीने गौरव.

विटा- ( जि. सांगली ) :-विटा शहरातील हनुमान स्टील या दुकानाला आणि राहत्या घराला काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली. ज्वाळांचे प्रचंड लोट आणि धूराचा भरलेला परिसर पाहून नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता. या जीवघेण्या प्रसंगात एक क्षणही न दवडता, होमगार्ड लखन भुमकर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीकडे धाव घेत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अदम्य धैर्य दाखवले. त्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि मानवतेचे आश्चर्यकारक उदाहरण घालून दिले.
या शौर्यपूर्ण पराक्रमाचा गौरव करण्यासाठी शिवप्रताप मल्टीस्टेट तर्फे होमगार्ड लखन भुमकर आणि त्यांच्या परिवाराचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत कणसे यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि संकटाच्या काळात मानवतेला प्राधान्य देणाऱ्या अशा गौरव उपक्रमासाठी शिवप्रताप संस्थेला मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी भुमकर यांच्या धाडसाबद्दलही गौरवोद्गार काढत समाजासाठी अशा नायकांचे अस्तित्व प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
या सोहळ्यास शिवप्रताप संस्थेचे चेअरमन मा. शेखर साळुंखे, व्हा.चेअरमन हनमंतराव सपकाळ, कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे, बँकिंग सल्लागार अशोक नाईक यांसह संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानवतेसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या “विट्याच्या वीराचा” हा सन्मान सोहळा संपूर्ण परिसरात अभिमानाचा विषय ठरला.




