आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
कोंढावळे:-(वाई)-भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या अभिजीत कोंढाळकर यांची कोंढावळे गावात मिरवणूक.
पत्रकार एकनाथ चौधरी वाई तालुका PRO

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या अभिजीत कोंढाळकर यांची कोंढावळे गावात मिरवणूक.

शूरवीरांचा ओळखला जाणारा सातारा जिल्ह्यातील कोंढावळे गावातील अजून एक शूर अभिजीत आनंदा कोंढाळकर भारतीय सैन्य दलात भरती झाला.त्याचा कौतुक सोहळा गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. गावच्या कमानी पासून ते मंदिरापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली. या आनंद सोहळ्यात गावचे सरपंच रोहिदास कोंढाळकर उपसरपंच शांताराम कोंढाळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते अंकुश कोंढाळकर व राजेश खंडाळकर त्याचबरोबर संपूर्ण गावकरी ही उपस्थित होते.आपल्या गावचा सुपुत्र देशासाठी काम करणार आहे याचा अभिमान त्यावेळी सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.




