पारनेर:-संपादक व पत्रकार सुरेश खोसे पाटील यांना “जिजाऊ माँ साहेब आदर्श संपादक” पुरस्कार जाहीर.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

संपादक व पत्रकार सुरेश खोसे पाटील यांना “जिजाऊ माँ साहेब आदर्श संपादक” पुरस्कार जाहीर.

तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर .
राजकुमार इकडे (अहिल्यानगर)
पारनेर – नगर जिल्ह्यातील विविध वर्तमानपत्रांसाठी १९९२ पासून काम करणारे व १९९७ पासून ” दैनिक पारनेर समर्थ ” या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून संपादकांच्या भुमिकेते तून पत्रकारितेची लेखनी चालविणारे शिवश्री सुरेश काशिनाथ खोसे पाटील यांना मराठा सेवा संघ प्रणित बीड जिल्ह्यातील आष्टी येथील तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेचा पत्रकारिता क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ” जिजाऊ माँ साहेब आदर्श संपादक पुरस्कार २०२६ ” जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवश्री ज्येष्ठ पत्रकार अॅड सिताराम पोकळे यांनी दिली आहे
पत्रकार व संपादक सुरेश खोसे पाटील यांनी १९९२ पासून आपल्या पत्रकारितेच्या लेखनीतून समाजातील अन्याय, अत्याचार यावर प्रकाश टाकत न्याय मिळवून देण्याचे काम केले , समाजातील कृषी , सामाजिक , शैक्षणिक , धार्मिक , अध्यात्मिक , सहकार , आर्थिक , राजकीय , या व इतर क्षेत्रांवर सातत्याने लेखन केल्याने याचे वास्तव समाजाला समजले , यातून खरे , खोटे लक्षात आणून देण्याचे काम ही त्यांनी केले .
सुरेश खोसे पाटील हे संपादक असलेले ” दैनिक पारनेर समर्थ ” हे दैनिक फक्त पारनेर तालुक्या पुरते मर्यादित न राहता अहिल्यानगर जिल्हा व राज्यात ही नावलौकिकास पात्र ठरले आहे . त्यांच्या याच कार्याची दखल घेत पत्रकारांसाठी कार्य करत असलेला देशातील सर्वांत मोठ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांना प्रथम पारनेर तालुका उपाध्यक्ष , नंतर अहिल्यानगर जिल्हा सचिव पदावर काम करण्याचा करण्याची संधी देत , आता राज्य कार्यकारिणी वर सदस्य पदावर काम करण्याचा बहुमान दिला . त्यांच्या पत्रकारितेच्या लेखनीची दखल घेत त्यांना राज्यातील विविध संस्थांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले आहे .
सुरेश खोसे पाटील यांच्या या बहुमानाबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे , पालकमंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील , खा . डॉ . निलेश लंके , माजी खा . डॉ . सुजय विखे पाटील , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ . शालिनी ताई विखे पाटील , आ . काशिनाथ दाते , महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संजय भोकरे , प्रदेशाध्यक्ष गोविंदराव वाकडे , प्रदेश सचिव डॉ . विश्वासराव आरोटे व इतरांनी अभिनंदन केले आहे.




