पुणे विमानतळावर इंडिगोची फ्लाइट रद्द; प्रवाशांना मोठी गैरसोय.
पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुणे विमानतळावर इंडिगोची फ्लाइट रद्द; प्रवाशांना मोठी गैरसोय.

पुणे विमानतळावर इंडिगो एअरलाईनचे भरपूर फ्लाइट आज अचानक रद्द करण्यात आली. या अनपेक्षित निर्णयामुळे विमानतळावर उपस्थित असलेल्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय व त्रास सहन करावा लागला.
फ्लाइट रद्दीकरणाची माहिती अनेक प्रवाशांना वेळेवर न दिल्याने विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे प्रवाशांमध्ये संताप व नाराजी दिसून आली.
रिबुकिंग आणि रिफंड प्रक्रियेत होणारा विलंब, पर्यायी फ्लाइटची उपलब्धता याबाबतही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. कामानिमित्त, वैद्यकीय कारणांसाठी आणि इतर तातडीच्या कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना या विलंबाचा मोठा फटका बसला.
इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणांमुळे फ्लाइट रद्द करण्यात आल्याचे सांगितले असून प्रभावित प्रवाशांना पुढील उपलब्ध फ्लाइटमध्ये व्यवस्था करण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले आहे.




