श्रीरामपूर:-उंदिरगावात बिबट्या जेरबंद.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

उंदिरगावात बिबट्या जेरबंद.

श्रीरामपुर (प्रतिनिधी ) कृषी उत्पन्न बाजार समिती चे उंदिरगाव येथील संचालक राजेंद्र पाटील पाऊलबुद्धे यांची उंदिरगाव येथे वैजापुर रोड ला शेती आहे दि 3 / डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्याच गोठ्यातील गाभण शेळी बांधावर चरत असताना बिबट्याने हल्ला करून तिला त्यांच्याच उसाच्या शेतात ओढून नेले सदर घटना त्यांच्या शेतीवरील मॅनेजर अनिल ताके यांनी पाहिल्यानंतर लगेचच त्यांनी पाऊलबुद्ध यांचे चिरंजीव यांना माहिती दिली त्यांनी आमदार ओगले श्रीरामपुर वनविभाग आणि वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम यांना कळवले .वनविभागाचे मृत शेळीचा पंचनामा केल्यानंतर आमदार ओगले यांच्या निर्देशानुसार तिथे तात्काळ वन विभागाचे वनपाल सानप व वाइल्ड लाईफ रेस्क्यू टीमने त्वरित मध्यरात्री जाऊन उसाच्या क्षेत्रात पिंजरा लावला . पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकावा म्हणून त्यांनी अर्धवर खाल्लेली शेळी चारा म्हणून ठेवली . आज ५ डिसेंबर रोजी पहाटे बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला गेला सदर घटना कळल्यानंतर वन विभागाने वनरक्षक अक्षय बडे . राहुल कानडे वनपाल सानप साहेब . वाइल्ड लाईफ रेस्क्यू टीपचे प्राध्यापक रोहित बकरे . सार्थक शि दे . तुषार बनकर व अक्षय अभंग यांनी घटनास्थळी जाऊन पिंजऱ्यातील बिबट्याला सुरक्षित ठिकाणी हलविले . पिंजऱ्यात अडकलेला बिबटया बघायला ग्रामस्थांनी गर्दो केली होती . सर्वांनी आ . ओगले यांच्या तत्परतेचे कौतूक केले . पाऊलबुद्धे यांच्या शेतात अजून जेरबंद झालेल्या बिबट्याची आई व एक भावंड बसलेले आज दुपारी पहाण्यात आले आहे त्यासाठी अजून एक पिंजरा तिथे लावण्यात आलेला आहे तसेच उंदिरगाव मध्ये अजून ७ ते ८ बिबटे असल्याने त्यांना ही पडण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे.




