पुणे:-(वारजे)-चिदानंद प्रतिष्ठानची दत्त जयंती उत्साहात साजरी.
पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

चिदानंद प्रतिष्ठानची दत्त जयंती उत्साहात साजरी.

पुणे वारजे. चिदानंद प्रतिष्ठानतर्फे दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती. मंगल वादन, दत्त जयघोष आणि भजनी स्वरांनी वातावरण दुमदुमून गेले.
दत्त जयंतीचा हा सोहळा तीन दिवसा आधी पासून चालत असुन नावाजलेल्या किर्तनकारानचे किर्तन आयोजित करण्यात आले होते या किर्तनाला लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गुरूपूजन व दत्त आरतीने झाली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत दत्त यज्ञ, नामसंकिर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले.
या उत्सवात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही या प्रसंगी देण्यात आली.




