वैभववाडी : उंबर्डे-फोंडा हा राज्य मार्ग सातत्याने नादुरुस्त – याकरिता १२५ कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली मागणी.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वैभववाडी : उंबर्डे-फोंडा हा राज्य मार्ग सातत्याने नादुरुस्त – याकरिता १२५ कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली मागणी.

वैभववाडी : उंबर्डे-फोंडा हा राज्य मार्ग सातत्याने नादुरुस्त होत असतो.या मार्गाचे क्रॉक्रिटीकरण होण गरजेच आहे, याकरिता १२५ कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. उंबर्डे – वैभववाडी-फोंडा – कनेडी- कणकवली-आचरा या राज्य मार्गावरील उंबर्डे-फोंडा हा भाग सध्या अतिशय खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत असून काहींना जीव गमवावा लागला आहे.या रस्त्यासंदर्भात श्री. लोके यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे भेट घेतली.या मार्गाची अवस्था मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अंदाजे १२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.त्यांच्या मागणीबाबत मंत्री राणेंनी सकारात्मकता दर्शविली आहे.




