महाबळेश्वर तालुकास्तरीय खो खो कबड्डी स्पर्धेत इलाबेन महेता विद्यालयाला विजेतेपद.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
महाबळेश्वर तालुकास्तरीय खो खो कबड्डी स्पर्धेत इलाबेन महेता विद्यालयाला विजेतेपद.

पाचगणी व भीलार येथे तालुकास्तरीय कबड्डी व खो खो स्पर्धेत ईलाबेन महेता विद्यालयाला विजेतेपद पटकावले त्या नंतर स्पर्धेतअसा नाऱ्या सर्व संघाचे विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करनारे शिक्षकांचे विद्यालयाचे प्राचार्य तपासे सर यांनी आभार मानले .
14 वर्ष वयोगटातील मुलींच्या खो खो संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
17 वर्ष वयोगटातील मुलींच्या खो खो संघाने प्रथम क्रमांक पटकावला तसेच 17 वर्षाखालील मुलांच्या खो खो संघानेही प्रथम क्रमांक पटकावला.
19 वर्षा खालील मुलांच्या संघाला अतिशय चुरशीच्या सामन्यात उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले
तसेच कबड्डी स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
19 वर्षाखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला सर्व विजयी संघाचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक प्रविण जाधव सर समीर जंगम सर यांचे संस्थेचे अध्यक्ष,सचिव सर्व पदाधिकारी विद्यालयाचे प्राचार्य तपासे सर पर्यवेक्षक पवार सर तसेच सर्व शिक्षकांनी मनापासून अभिनंदन केले.




