कलेढोण-(खटाव):-दिनांक आठ रोजी रविवारीपूज्य गीतामाई यांचा कलेढोण येथे पुण्यतिथी सोहळा.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
दिनांक आठ रोजी रविवारी पूज्य गीतामाई यांचा कलेढोण येथे पुण्यतिथी सोहळा.
मायणी प्रतिनिधी—–कलेढोण तालुका खटाव येथील गोंदवलेकर महाराज यांच्या मातोश्री पूज्य गीतामाई यांचा पुण्यतिथी सोहळा दिनांक ८ रोजी रविवारी संपन्न होणार असल्याची माहिती येथील ट्रस्टने दिली आहे अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की दोन तारखेपासून हा सोहळा सुरू असून यासाठी दररोज सकाळी दहा ते बारा पारायण, दुपारी बारा वाजता आरती, एक ते तीन महाप्रसाद व भजन दुपारी तीन ते चार पारायण साडेचार ते साडेसहा नाम जप सात वाजता आरती साडेसात ते साडेआठ महाप्रसाद नऊ ते दहा भजन असे नित्य कार्यक्रम सुरू आहेत दिनांक आठ रोजी पुण्यतिथी निमित्त फुलांचा कार्यक्रम होणार असून नऊ ते बारा या वेळेत गीतामाई यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर महाप्रसाराने सांगता होणार आहे या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना राहण्याची सोय करण्यात आली आहे कलेढोण हे गाव गोंदवले विटा रोड रस्त्यावर असून मायणीपासून पूर्वेला बारा किलोमीटर आहे तरी भाविकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन ट्रस्टने केले आहे