सिंधुदुर्ग:-..एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो !
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
…एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो !
_सिंधुदुर्ग या देशातल्या पहिल्या पर्यटन जिल्हयाला अनेक पैलुंनी वेगळे महत्व आहे. इकडची लोककला, संस्कृती, परंपरा, अलौकीक निसर्गसौंदर्य आणि फणसासारखी गोड माणसे, याचे आकर्षण सर्वांनाच असते. साहित्यातुन किंवा सध्या सोशल मीडीयाच्या माध्यमातुन हाच सिंधुदुर्ग सर्वांच्या नजरेत आहे. प्रत्यक्ष सिंधुदुर्गातील चित्र मात्र अत्यंत वेगळे आहे. खराब रस्ते किंवा अन्य मुलभुत सुविधांचा अभाव तर राज्याच्या कानाकोप-यात दिसतोच आहे. परंतु गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गच नव्हे तर अवघ्या कोकणला अवैध धंद्यांनी पोखरले आहे. हाताला काम नसले तर पोटाला काहीतरी रोज द्यावेच लागते. त्यामुळे इथले तरूण अशा अवैध धंद्यांकडे वळताना दिसतात. अर्थात यात त्यांचा दोष किती आणि सिस्टीमचा दोष किती, हा प्रश्न वेगळा आहे, परंतु सध्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात घेतलेली कठोर भुमिका हि तितकीच महत्वाची आहे.