भुसावळ:-17 वर्षा आतिल शालेय कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
17 वर्षा आतिल शालेय कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन.
बियाणी पब्लिक स्कूल विजयी तर महाराणा प्रताप विद्यालय उपविजयी ( मोबाईलच्या युगात एवढे खेळाडू मैदानावरती देशी खेळासाठी आले हे अभिमानाची बाब डॉ. सचिन पांंनझडे)
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे 17 वर्षातील मुलांच्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन पानझडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव डॉ संगीता बियाणी यांनच्या सह प्रमुख अतिथी म्हणून दिव्य मराठीचे श्रीकांत सराफ व शाळेचे प्राचार्य डी. एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वयक डॉ.प्रदीप साखरे, क्रीडा भारतीचे विभागीय सचिव बी. एन. पाटील, डी आर धांडे , विलास पाटील यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, विस संघांचे 240 खेळाडू, पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम उद्घाटक डॉ. सचिन पानझडे, व श्रीकांत सराफ यांच्या हस्ते प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद व मामा बियाणी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन व क्रीडांगण पूजन करून उद्घाटन करण्यात आले., प्रास्ताविक डॉ प्रदीप साखरे यांनी केले. पातळ का स्पर्धेविषयी माहिती दिली व तालुकास्तरावरती होत असलेल्या दहा खेळ व उर्वरित 83 खेळ हे जिल्हा स्तरावर होत असल्याचे सांगितले. अशा 93 खेळांमध्ये शाळांमधून खेळाडूंना सहभागी होता येते .स्पर्धेचे उद्घाटक डॉ. सचिन पानझडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले कारण मोबाईलचे युगात तालुक्यातून एवढे संघ कबड्डी सारख्या देशी खेळांमध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व स्पर्धेत खेळाडू वृत्तीने खेळून आपल्या खेळाचे प्रदर्शन करावे व जय पराजय आपण पाचवा .असे मार्गदर्शन केले. तसेच मुख्य अतिथी श्रीकांत सराफ व कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. संगीता बियाणी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व विजयी होऊन आपल्या शाळेचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे नांव उज्वल करा व महेंद्रसिंग धोनी ,सचिन तेंडुलकर सारखं कसे बनता येईल याकडे लक्ष केंद्रित करा असे सांगितले.पंच म्हणून डॉ. प्रदीप साखरे व बी एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , नयन सागर मनी, व्ही. एस. पाटील, काजल बारोट, मुकेश मोरे, गजानन यशवंत पाटील, नम्रता स्वप्निल गुरव, व्ही.एस. वाणी, एन. डी.राजपूत, ललित फेगडे, हिम्मत पाटील, दिलीप सुरवाडे, डी.आर. धांडे,वंदना ठोके, सुनील चौधरी, एस. सी. पाटील. यांनी काम पाहिले. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 17 वर्षातील कबड्डी स्पर्धेचा निकाल. या स्पर्धेमध्ये पहिली सेमी फायनल एन के नारखेडे विद्यालय भुसावळ आणि बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ याच्यामध्ये झाली यामध्ये बियाणे पब्लिक स्कूल 19 गुणांनी विजयी झाले. दुसरी सेमी फायनल महाराणा प्रताप आणि आर. जी. झांबरे विद्यालय भुसावळ यांच्यामध्ये झाली यामध्ये झाली या चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये महाराणा प्रताप विद्यालय 4 गुणांनी विजयी झाले. कबड्डी चा अंतिम सामना बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ आणि महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ यांच्यामध्ये झाला यात बियाणी पब्लिक स्कूलचा संघ 6 गुणांनी विजयी होऊन प्रथम स्थानी राहिला तर द्वितीय स्थानावर महाराणा प्रताप विद्यालयाचा संघाला समाधान मानावे लागेले. . तृतीय स्थानी एन. के. नारखेडे विद्यालय चा संघ राहिला. स्पर्धा यशस्वीते साठी पी.आर. साखरे, हिम्मत पाटील यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक व बियाणी मिलिटरी स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केले.