भुसावळ:-कबड्डी स्पर्धेत रा.धो. माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी विद्यालय विजयी – खेळाडूंनी जय व पराजय पचवावा- पीआय उद्धव ढमाले.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
कबड्डी स्पर्धेत रा.धो.माध्यमिक विद्यालय व महात्मा गांधी विद्यालय विजयी – खेळाडूंनी जय व पराजय पचवावा- पीआय उद्धव ढमाले.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने बियाणी मिलिटरी स्कूल भुसावळ येथे 14 वर्षातील व 19 वर्षातील मुलांच्या कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे PI उद्धवजी ढमाले यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळ तालुका शालेय पोषण आहार अधीक्षक बी.डी. धाडी हे होते प्रमुख तिथी म्हणून बियाणी एज्युकेशन ट्रस्टच्या सचिव डॉ संगीता बियाणी, शाळेचे प्राचार्य डी. एम. पाटील, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष तालुका समन्वयक डॉ.प्रदीप साखरे, क्रीडा भारतीचे विभागीय सचिव बी. एन. पाटील, प्रभाकर बोरसे, यांच्यासह क्रीडा शिक्षक प्रशिक्षक, खेळाडू, पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथम उद्घाटक उद्धवजी ढमाले व बी.डी. धाडी यांच्या हस्ते प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत मेजर ध्यानचंद व मामा बियाणी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलन व क्रीडांगण पूजन करून उद्घाटन करण्यात आले., पी आय उद्धव ढमाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाडूंनी पराभवाला खचून जाऊ नये व विजयाचा मात करू नये म्हणजेच जयव पराजय हा खेळाडूंना पचवता आला पाहिजे. अभ्यासाबरोबरच खेळाला सुद्धा महत्त्व आहे. त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणात बी.डी. दाढी. यांनी सांगितले की अभ्यासाबरोबरच खेळाला विद्यार्थ्यांनी तेवढेच महत्त्व दिले पाहिजे क्रीडा स्पर्धा मुळे खेळाडूंचा सर्वांगीण विकास होत असतो.
तसेच खेळाडूच्या अंगी समय सूचकता येत असते यातूनच भारताचा सुजाण नागरिक तयार होतो. असे मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे. अंतिम सामना राजाराम धोंडी विद्यालय विरुद्ध महाराणा प्रताप विद्यालय यांच्यात झाला यात २० गुणांनी राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुऱ्हे पानाचे हा संघ विजयी झाला तर महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ द्वितीय स्थानी राहिला. तृतीय स्थानी पंडित नेहरू विद्यालय वराडसिम यांना समाधान मानावे लागले. 19 वर्षातील मुलांच्या सामन्यात अंतिम सामना महात्मा गांधी विद्यालय विरुद्ध के नारखेडे विद्यालय भुसावळ यांच्यात झाला. यात महात्मा गांधी विद्यालय वरणगाव 27 गुणांनी विजयी झाले तर के.नारखेडे विद्यालय भुसावळ चा संघ उपविजेता राहिला. पंच म्हणून बी एन पाटील, नयन सागर मनी राजू कुलकर्णी, नम्रता गुरव, काजल बारोट, गजानन पाटील, प्रदीप महाजन,मुकेश मोरे, वंदना ठोके, विलास पाटील, राजपूत सर, चव्हाण सर, हिम्मत पाटील, सुनील चौधरी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी डॉ. प्रदीप साखरे, लक्ष्मीकांत नेमाडे, हिम्मत पाटील, यांच्यासह सर्व क्रीडा शिक्षक व बियाणी मिलिटरी स्कूलचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विलास पाटील यांनी केले.