वाई नगरपरिषदेचा कोरोना-१९ महामारीच्या काळात लाखोंचा भ्रष्टाचारच.?
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई नगरपरिषदेचा कोरोना-१९ महामारीच्या काळात लाखोंचा भ्रष्टाचारच.?
आरोग्य विभाग प्रमुख व सहाय्यक आरोग्य विभाग अधिकारी यांची मा.मुख्याधिकारी साहेब यांच्या आदेशाला कचराकुंडी दाखवण्याचे काम.
वाई सातारा.
कोविड-१९च्या महामारीने संपूर्ण जगात तसेच संपूर्ण देशात थैमान घातले असताना वाई नगरपरिषद वाई तत्कालिन आरोग्य विभाग प्रमुख तसेच सहाय्यक आरोग्य विभाग अधिकारी यांचा आर्थिक सावळा गोंधळ चालला होता असे बोलने काही वावगे ठरणार नाही हा लाखोंचा भ्रष्टाचारच म्हणावा लागेल. कोविड-१९ चा काळ हा अत्यंत भयंकर होता जगभरात देशात अनेक जन मृत्यूशी झुंजत होते अनेक जण मृत्युमुखी झाले. जेथे मृत्यू होईल तेथेच त्याचे अंत्यसंस्कार करावे लागत होते. ना कोणी नातेवाईक , ना कोणी कुटुंबिय सदस्य ऐवढी भयानक परिस्थिती होती मात्र मृत शरीरांचा अंत्यसंस्कार विधीचा खर्च तेथील संबंधित प्रशासनच करत होते वाई नगरपरिषद वाई यांचे कडून २९४ मृतदेहांचे अंत्यसंस्कार विधी करण्यात आले मात्र वाई नगरपरिषद वाई तत्कालीन आरोग्य विभाग प्रमुख तसेच सहाय्यक आरोग्य विभाग अधिकारी हे तो अंत्यसंस्कार विधीचा खर्च संबंधितांच्या कुटूंबियांकडून वसुल करत होते ती रक्कम म्हणजे सात ते पंधरा हजार दरम्यान आकारण्यात येत होती मात्र याबाबत सविस्तर माहिती देण्यास वाई नगरपरिषद आरोग्य विभाग प्रमुख तसेच सहाय्यक आरोग्य विभाग अधिकारी हे टाळाटाळ करून अपुरी व खोटी माहिती देऊन झालेली आर्थिक देवाणघेवाण दडपण्याचे काम करत आहेत. दिनांक १२/१२/२०२४ च्या सुनावणी दरम्यान मा. मुख्याधिकारी साहेब वाई नगरपरिषद वाई यांनी लेखी आदेश पारित करून देखील अद्याप ही त्या आदेशाची अंमलबजावणी आरोग्य विभाग प्रमुख तसेच सहाय्यक आरोग्य विभाग अधिकारी यांचे कडून आजअखेर पर्यंत करण्यात आलेली नाही यामुळे नक्कीच हा लाखों रुपयांचा भ्रष्टाचार म्हणावा लागेल. मा. मुख्याधिकारी साहेब यांचा आदेश कचराकुंडीतला कचरा असे म्हटले तर काहीही वावगे ठरणार नाही.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन