खटाव:-मायणीच्या श्री संत मातोश्री सरुताई यांच्या १३ व्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलिप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
मायणीच्या श्री संत मातोश्री सरुताई यांच्या १३ व्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ.
दि. ८ ते १२ अखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन .
दि. १२ रोजी रथ सोहळ्यास ना. जयकुमार गोरे व मान्यवरांची उपस्थिती.
मायणी ता. खटाव येथील श्री संत सद्गुरू मातोश्री सरुताई माऊली यांच्या १३व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सोमवार दि.८ रोजी सदर सोहळ्यास प्रारंभ होत असल्याची माहिती श्री संत सद्गुरू मातोश्रीताई माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रवींद्र शेठ बाबर यांनी पत्रकारांना दिली.
या निमित्ताने दि. ८ ते दि. १२ सप्टेंबर अखेर पुढील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे –
सोमवार दि. ८ सकाळी ९. ३० वाजता श्री संत सद्गुरु मातोश्री सरुताई माऊली यांच्या श्री सरुताई लिला अमृत या ग्रंथाचे पारायण सोहळा व नामस्मरण सोहळा, दु. १ ते ३विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळ अंबवडे यांचा भजनाचा कार्यक्रम, दु. ३ ते ५ संतोष वरुडे प्रस्तुत होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा, संध्याकाळी ७ ते ९ ह.भ.प .बापू महाराज माळी (मायणी) यांचे कीर्तन.
मंगळवार दि. ९ दु. १ ते ३ चौंडेश्वरी महिला भजनी मंडळ विटा यांचा भजनाचा कार्यक्रम, दु. ३ ते ५ प्रासादिक भारुड ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड (आळंदी), संध्याकाळी ७ ते ९ ह.भ. प.नवनीत महाराज (करगणी ) यांचे कीर्तन.
बुधवार दि. १० दु. १ ते ३ दुर्गामाता महिला भजनी मंडळ कलेढोण, दु. ३ ते ५ हरिश्चंद्रेश्वर महिला हरिपाठ मंडळ मळणगाव (कवठेमंकाळ ) यांचा कार्यक्रम, संध्याकाळी ७ ते ९ ह.भ.प.सूर्याजी भोसले महाराज (पंढरपूर यांचे ) कीर्तन.
गुरुवार दि. ११ दु. १ ते ३ चौंडेश्वरी महिला भजनी मंडळ आटपाडी यांचा भजनाचा कार्यक्रम, दु. ३ ते ५ चला खेळू मंगळागौर मातोश्री महिला मंडळ (मायणी) यांचा कार्यक्रम, सं . ७ते ९ ह.भ.प.सतीश महाराज झेंडे (पोलीस कडेगाव ) यांचे कीर्तन.
शुक्रवार दि.१२ हा मुख्य दिवस असून या दिवशी पहाटे २.३०ते ४.२० ह.भ.प .माणिक महाराज पाचवड कर यांचे कीर्तन, पहाटे ४.३२ मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम, पहाटे ४. ४५ ओम दत्त चिले महाराज भजनी मंडळ, कोळेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम. सकाळी १० ह. भ.प. गणेश महाराज डांगे यांचे काल्याचे किर्तन, दु. १ वाजता एकतारी भजनी मंडळ भारुड.
याच दिवशी सकाळी ११ वाजता श्री संत सद्गुरु मातोश्री सरुताई माऊली यांच्या प्रतिमेचे रथातून मिरवणूक काढण्यात येण्यात असून सदर पालखी व रथ सोहळा ना. जयकुमार गोरे, ग्राम विकास व पंचायत राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माजी आमदार दिलीप येळगावकर, युवा उद्योजक अंकुशराव गोरे, सौ.सोनिया जयकुमार गोरे ,डॉ.सौ उर्मिला दिलीप येळगावकर, सौ.भारती अंकुशराव गोरे यांचे शुभहस्ते व श्री यशवंत हो जयवंत हो आश्रम देवस्थान ट्रस्ट व भक्तगण सिद्धेश्वर कुरोली यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.रथापुढे हत्ती घोडे उंट भजनी मंडळे असणार असणार आहेत.
काकड्यासाठी सलग चार दिवस उपस्थित राहणाऱ्या महिलांना माऊलींची साडी व भेटवस्तू देण्यात येणार आहे. सदर पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प.माणिक महाराज पाचवडकर हे काम पाहणार असून संपूर्ण सोहळ्याचे मार्गदर्शक म्हणून ह.भ.प.पांडुरंग लोहार सर काम पाहणार आहेत.तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सचिव रविंद्र बाबर व संयोजकांमार्फत करण्यात आले आहे.