पाचगणी:-अंजुमन-ए-इस्लाम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, तालुका स्तरावरील अंडर-१९ फुटबॉल स्पर्धेत मुले विजेता तर मुली उपविजेता.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पाचगणी:-अंजुमन-ए-इस्लाम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, तालुका स्तरावरील अंडर-१९ फुटबॉल स्पर्धेत मुले विजेता तर मुली उपविजेता.
पाचगणी, दिनांक ८ सप्टेंबर २०२५
सातारा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली महाबळेश्वर तालुका स्तरावरील अंडर-१९ वयोगटातील मुले व मुलींची फुटबॉल स्पर्धा अंजुमन-ए-इस्लाम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पाचगणी येथे यशस्वीरित्या पार पडली.
या स्पर्धेत अंडर-१९ मुलांच्या गटात अंजुमन-ए-इस्लाम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पाचगणीच्या संघाने अंतिम फेरीत न्यू एरा इंग्लिश हायस्कूल, पाचगणी यांमध्ये एक-एक गोल झाल्याने पेनल्टी मध्ये अंजुमन ने पराभव करून विजेतेपद मिळवले. विद्यार्थ्यांनी अफाट कौशल्य, जिद्द व संघभावना याचे दर्शन घडवत आपल्या शाळेचा झेंडा उंचावला. उपांत्य फेरीत अंजुमन शाळेने बिलीमोरिया संघाचा 4-0 गोल ने पराभव केला. तर न्यू इरा स्कुल पाचगणी संघाने संजीवन स्कुल पाचगणी यांच्यावर 2-0 गोल ने विजय मिळवला.
अंडर-१९ मुलींच्या गटात बिलीमोरिया स्कूलने अंतिम फेरीत अंजुमन-ए-इस्लामच्या मुलींचा पराभव 2-0गोल करून विजेतेपद पटकावले.
ही स्पर्धा न्यू इरा हायस्कूल, पाचगणी यांच्या उत्तम आयोजनाखाली पार पडली. सर्व सहभागी शाळांचे शिक्षक, प्राचार्य, क्रीडा समन्वयक आणि पालक यांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रदर्शनाचे कौतुक केले.
अंजुमन शाळेचे अध्यक्ष श्री ऍड. शौकत अली बेटगिरी यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की,
“ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत, चिकाटी आणि एकत्रित कामगिरीमुळे हे यश संपादन केले आहे. आम्हाला आता जिल्हास्तरावरील स्पर्धेकडे आत्मविश्वासाने वाटचाल करायची आहे.”यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अफरोज खान उपस्थित होत्या.
या विजयामुळे अंजुमन-ए-इस्लाम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पाचगणी हे महाबळेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत जिल्हास्तरावरील अंडर-१९ फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे.
विजेत्या संघास शाळेचे क्रीडा शिक्षक प्रमोद निकम, रियाज आतार, मार्क मेयर, सुमन सोरी यांचे मार्गदर्शन मिळाले.शाळा प्रशासन, शिक्षकवृंद, पालक आणि संपूर्ण शाळा परिवाराकडून विजयी संघास सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.