पारनेर:-सरपंच प्रकाश गाजरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सरपंच प्रकाश गाजरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार.
ज्ञानज्योती सामाजिक संस्थेतर्फे कार्याचा गौरव.
पारनेर-( राजकुमार इकडे)
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी पट्ट्यातील म्हसोबा झाप ग्रामपंचायतचे सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे यांना राज्यस्तरीय ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांना दिला जातो. पुरस्कार वितरण समारंभात माजी कुलगुरू डॉ. एस. बी. निमसे, माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके आणि प्राचार्य डॉ. कुंडलिकराव शिंदे यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करते. सरपंच प्रकाश गाजरे यांनी म्हसोबा झाप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आदिवासी आणि ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने विकासकामांना गती देत स्थानिक समस्यांचे निराकरण केले आहे.
पुरस्कार सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग आहेर, अरुण बेलकर, कृष्णाजी गाजरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सन्मानामुळे पारनेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील ग्रामीण विकासाच्या कार्याला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. सरपंच प्रकाश गाजरे यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. हा पुरस्कार केवळ त्यांचा नव्हे, तर संपूर्ण म्हसोबा झाप गावाचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.