फलटण:-ऑस्ट्रियाच्या एका कथित अर्थशास्त्रज्ञ गुनथर फेलिंगर यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल करा: अनिलकुमार कदम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
ऑस्ट्रियाच्या एका कथित अर्थशास्त्रज्ञ गुनथर फेलिंगर यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल करा: अनिलकुमार कदम.
फलटण:- ऑस्ट्रियाच्या एका कथित अर्थशास्त्रज्ञाने असच एक संतापजनक वक्तव्य केलं आहे. गुनथर फेलिंगर यांनी भारताविरोधात विषारी वक्तव्य करुन वाद निर्माण केला आहे. गुनथर फेलिंगर स्वत:ला स्वयंघोषित नाटो विस्तार समितीचा अध्यक्ष मानतो. गुनथरने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर भारताचे तुकडे पाडण्याच वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याने ‘एक्स इंडिया’ नावाचा एक नकाशा सादर केलाय. त्यात त्याने भारताच्या अनेक भागांना पाकिस्तान, बांग्लादेश आणि कथित खलिस्तानचा हिस्सा दाखवला आहे. भारतीय स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि विज्ञाननिष्ठा समाजवाद राष्ट्रीय एकात्मता या भारतीय राज्यघटनेच्या घटनात्मक गाभा घटका विरोध विचार सोशल मीडियावर व्यक्त करणारे गुनथर फेलिंगर यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या सार्वभौम स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता विरोध विचार सार्वजनिक स्वरुपात व्यक्त केल्या बद्दल व देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करणारे देशद्रोही विचार प्रसारित केले बद्दल फौजदारी खटला दाखल करावा.
ऑस्ट्रियाच्या एका कथित अर्थशास्त्रज्ञाने असच एक संतापजनक वक्तव्य केलं आहे. गुनथर फेलिंगर यांनी भारताविरोधात विषारी वक्तव्य करुन वाद निर्माण केल्या बद्दल त्वरित अटक करावी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व आपल्या देशात सुध्दा फौजदारी देशद्रोही खटला दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे.
भारतीय स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी भारत सरकारने तातडीने आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल करुन गुनथर फेलिंगर या माथेफिरू तथाकथित अर्थतज्ञ असलेल्या विकृत इसमाला कायमची अद्दल घडवण्यासाठी कायदेशीर लढा द्यावा.जगातील कोणीही भारताच्या विरोधात बोलण्याची हिंमत होणार नाही यासाठी ऑस्ट्रियाच्या तथाकथित अर्थशास्त्रज्ञ गुनथर फेलिंग यांच्या संतापजनक वक्तव्य केलं आहे. त्याला बेड्या घालून भारतात आणा.भारतीय न्यायालयात देशद्रोह व देशविघातक कृत्ये यासंदर्भात तातडीने खटला दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केली आहे.