दादर:-(मुंबई)-ब्राम्हण सेवा मंडळाच्या शतकोत्सवी गणेशोत्सवात ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील यांचे ‘वारकरी कीर्तन’!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
ब्राम्हण सेवा मंडळाच्या शतकोत्सवी गणेशोत्सवात ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील यांचे ‘वारकरी कीर्तन’!
मुंबई (प्रतिनिधी) : दादर (मुंबई) येथील ख्यातनाम ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकोत्सवी गणेशोत्सव २०२५ यंदा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. या सोहळ्यात विविधतेने नटलेले सांस्कृतिक, ज्ञानप्रद आणि मनोरंजनपर कार्यक्रम सादर होत असून, रसिक गणेशभक्तांना समृद्ध अनुभव देत आहेत.
या कार्यक्रममालेचा समारोप भक्तिरसाने ओथंबून वाहणाऱ्या कीर्तनाने होणार असून, लोकप्रिय कीर्तनकार ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील यांच्या मधुर वाणीतून ते रसिक गणेशभक्तांना ऐकायला मिळणार आहे. श्री. पाटील सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे मुख्य परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबईजवळील सरलांबे येथे श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय सुरू करून वारकरी परंपरेच्या प्रसारासाठी मोलाचे कार्य केले आहे.
त्यांचे हे कीर्तन शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता, ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (प), मुंबई येथे पार पडणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून अधिकाधिक भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.
ब्राह्मण सेवा मंडळाच्या परंपरेचा मागोवा घेतला असता, त्यांचा पहिला श्री गणेशोत्सव ११ ते २० सप्टेंबर १९२६ रोजी ‘मुकुंद मॅन्शन’ येथे संपन्न झाला होता. स्थापनेपासून मंडळाने अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम, स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले असून, अनेक दिग्गज कलाकार, नामवंत व्याख्याते आणि मान्यवरांनी येथे आपली कला आणि विचार या मंचावर मांडले आहेत.
यंदाच्या शतकोत्सवी उत्सवात लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता बर्वे, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे, अमित वझे, मानसी वझे, निनाद सोलापूरकर, जयदीप वैद्य, अंजली मराठे, विनय चौलकऱे, गंधार जोग, प्रद्योत पेंढारकर, सर्वेश देशपांडे यांसारख्या कलाकारांनी आपली कला सादर केली. तसेच माजी लष्कर अधिकारी ले. ज. विनायक पाटणकर (नि.) व मा. ले. ज. एस. एस. हसबनीस (नि.) यांची ‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’ या विषयावर विशेष मुलाखत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी सादर केली. प्रख्यात गायिका राणी वर्मा, संगीतकार कौशल इनामदार, तसेच अनेक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी या मंडळाच्या श्री गणेशाचे दर्शन घेतले व शतकोत्सवी उत्सवाला आपली उपस्थिती लावली.
प्रसिद्धी व जनसंपर्क प्रमुख : राम कोंडीलकर