कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कुडाळ:-महू धरणावरच पाणी परिषद धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवणार- वसंतराव मानकुमरे

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत

महू धरणावरच पाणी परिषद धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवणार- वसंतराव मानकुमरे

कुडाळ दि: जावळी तालुक्यातील महू व हातगेघर धरणग्रस्तांच्या पाठिंब्यासाठी व त्यांची साथ मिळावी. यासाठी ही कुडाळ नगरीची पाणी परिषद आहे. यापुढे महू धरणावरच पाणी परिषद घेऊन धर्म चे प्रश्न सोडवणारअसा सार्थ विश्वास महू हातगेघर धरणग्रस्त व लाभधारक कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय वसंतराव मानकुमरे यांनी कुडाळ ता. जावळी येथे व्यक्त केला.
नियोजित कार्यक्रमाप्रमाणे कुडाळ या ठिकाणी महू हातगेघर धरणग्रस्त व लाभधारक यांच्या समस्यांबाबत मांडणी करण्यासाठी कुडाळ नगरीत पाणी परिषद आयोजित केली होती. या वेळेला धरणग्रस्तांना साथ देण्याचा तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अजब मैदानावरील आंदोलनाला शासकीय पातळीवर अध्यादेश काढण्याचे काम करणारे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तसेच समितीचे अध्यक्ष माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा छत्रपतींचे वंशज माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह मान्यवरांच्या अभिनंदनचा ठराव घेण्यात आला.
या ऐतिहासिक पाणी परिषदेला सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, रवी परामणे, तानाजी शिर्के, संदीप परामणे, श्रीमती शिर्के, शिवाजीराव मर्ढेकर, मालोजीराव शिंदे, मच्छिंद्र मुळीक, हिंदुराव तरडे, तानाजी शिर्के, राजेंद्र दादा फरांदे – पाटील, बाळासाहेब निकम, एकनाथ रोकडे यांच्यासह महू, दापवडी ,रांजणी,
वहागाव, काटवली, बेलोशी, करहर ,आनेवाडी, महीगाव, मोरघर ,पवारवाडी रायगाव, सायगाव यास जावळी तालुक्यातील अनेक गावातील धरणग्रस्त व लाभदायक क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले की , सातारा जावळीचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. धरणग्रस्तांना गावठाण देण्यात आले. फलटण- खंडाळा या भागातही त्यांचे चांगले पुनर्वसन झालेले आहे. जावळी तालुक्यामध्ये चार एकर ऐवजी आठ एकरचा स्लॅब झाल्यामुळे याच भागात पुनर्वसन होऊ शकले नाही. ही वस्तुस्थिती आहे.
तरीही धरणग्रस्त प्रत्येक खातेदाराला दोन एकर जमीन वाटप केलेले आहे. तर कावडी सारख्या ठिकाणी एकरी १५ लाखाचे पॅकेज मिळाले आहे. ज्यांची गुंठाभर जमीन गेलेली आहे. त्यांनाही पैसे मिळालेले आहेत. हे धरणग्रस्तांच्या लढ्यामुळे शक्य झालेले आहे. त्यामुळे धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आम्ही भीक मागून आंदोलन केले. त्याचे फलित म्हणून धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत आहे. याच भागातील लोकांचे जमिनी कालव्यासाठी जाऊ नये. म्हणून जमिनीखालून पाईपलाईन करून पाणी सोडण्यात आलेले आहे. तसेच धरणग्रस्तांनाही लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून धरणाचे पाणी पोचवण्याचे काम केले आहे. असे स्पष्ट करून श्री मानकुमरे म्हणाले, राजकारण करत नाही. परंतु, या भागामध्ये मला जिल्ह्यात प्रतिनिधित्व करण्याची धरणग्रस्तांनीच संधी दिलेली आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आदरणीय शिवेंद्रराजे भोसले नक्कीच धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवतील अन्यथा त्यांच्या विरोधातही आंदोलन करण्याची तयारी असे त्यांनी सांगितले. सर्व धरणग्रस्तांसाठीच करावे लागत आहे. कोणत्याही स्वार्थ नाही. असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने धरणग्रस्त व लाभदायक उपस्थित राहिल्यामुळे पाणी परिषद यशस्वी झाली. शेवटी धरणग्रस्त विकास धोंडे यांनी उपस्थित यांचे आभार मानले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button