सातारा:-शेतकरी संघटनेच्या शरद जोशींच्या आठवणींना दिला कार्यकर्त्यांनी उजाळा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शेतकरी संघटनेच्या शरद जोशींच्या आठवणींना दिला कार्यकर्त्यांनी उजाळा.
सातारा दि: महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तळमळतेने झटणारे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी दिवंगत शरद जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी श्री जोशी यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याचे जावळी तालुका अध्यक्ष मनोहर सणस यांनी सांगितले.
सातारा तालुक्यातील बसप्पा वाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला संघटनेच्या शेतकऱ्यांनी विविध प्रश्नांना वाचा फोडली. यावेळी कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथील शेतकरी संघटनेचे संजय गायकवाड यांची शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली
सातारा जिल्ह्यातील चालू हंगामातील ऊसला प्रति टन ३६५० दर द्यावे.तसेच शेतमालावर वायदे बंदी घालण्यात येवू नये. जी.एम. बियाण्यास परवानगी द्यावी व आयात कर लावावा. सहकारी साखर कारखाने शेअर्स वाढवू नयेत.कारखानेची मालमत्ता वाढल्यावर सभासदाना मोफत वाढीव शेअर्स द्यावे . साखर कारखान्याच्या प्रगतीसाठी शेतकरी संघटना सहकार्य करत आहे. त्यांना सुद्धा साखर कारखान्याने सामावून घ्यावे असे शेतकऱ्यांनी सांगितले.
या महत्वपूर्ण बैठकीला शेतकरी संघटनेचे सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच शेतकरी नेते बाळासाहेब चव्हाण, प्रभाकर शेवते, संजय कदम, आनंदा महापुरे, शशी कदम, मारुती सावंत, पवार सर, पांडुरंग सावंत, विजय कुंभार,, बाळासाहेब देसाई उपस्थित होते.