वाई:-पर्यावरणपूरक उपक्रमासाठी किसन वीर महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सचे मोलाचे योगदान.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पर्यावरणपूरक उपक्रमासाठी किसन वीर महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सचे मोलाचे योगदान.
जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथील एनसीसी कॅडेट्स यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी वाई शहरातील विविध घाटांवर जनजागृती करून वाई पंचक्रोशीतील नागरिकांना गणेशमूर्तींचे पारंपरिक पद्धतीने नदीमध्ये विसर्जन न करता त्या दान करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी आपापल्या गणेशमूर्ती स्वखुशीने एनसीसी कॅडेट्सकडे सुपूर्द केल्या. या माध्यमातून नदी प्रदूषण रोखण्यास मदत होऊन पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.
या उपक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी साहेब, पोलीस उपनिरीक्षक भगवान गांगुली साहेब, तसेच किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ. गुरुनाथ फगरे सर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ. समीर पवार आणि कॅडेट्सनी विशेष परिश्रम घेतले.
किसन वीर महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सच्या या कार्याचे स्थानिक नागरिकांकडून तसेच विविध स्तरांतून कौतुक होत आहे.