पारनेर:-जरांगेचं उपोषनांचं श्रेय शेवटी -विखेंनाच!
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
जरांगेचं उपोषनांचं श्रेय शेवटी -विखेंनाच!
पारनेर (राजकुमार इकडे)
आजच्या मराठा आंदोलनाच्या निमित्ताने ज्या काही मागण्या गरजवंत मराठ्यांच्या पदरात पडल्या यात एक गोष्ट लक्षात घ्या की सरकार ला झुकण्यास भाग पाडाव लागल आणि हे फक्त गरीब मराठ्यांनी सरकार गुडघ्यावर आणल या साठी जे लोक आंदोलनात होते आणि जिनी जो त्रास सहन केला त्यांच्या परिश्रमाच चीज आहे शिवाय खेड्यापाड्यातून आलेले मराठा बांधवानी जर मुंबईत फक्त ५ टक्के मराठा आले तर मुंबईच जीवनमान हे विस्कलीत झाल आणि जर अजून ६०-७० टक्के आले असते तर काय परस्थिती झाली असती फक्त कल्पना करा आणि यात पुढील टप्प्यात राज्यातून विविध भागातून महिला वर्ग सहभागी होणार होता. सरकार ला या आंदोलनाच गांभीर्य समजण्यास वेळ लागला यात सरकारी यंत्रणेच अपयश. शिवाय आंदोलन स्थळी सुरवातीला जो जाणीवपूर्वक त्रास दिला यातून मराठा बांधव चिडून एकवटला. एक म्हण आहे. “परस्थिती जेवढी बिकट, मराठा तेव्हढा तिखट” हे मान्य करावाच लागल. यामुळे प्रशासन व सरकार व राजकीय नेते यांच्यावर प्रचंड दबाव होता.मराठा एकवटला तर इतिहास घडतो हे सत्य आजही नाकारता येत नाही आणि विद्यमान सरकार ने काही अटी मान्य करत काही अंशी मराठा समाजाचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. शिवाय आंदोलन काळात राज्याचे मुख्यमंत्री यांनी मराठा आंदोलकांकडून प्रचंड आरोप होत असताना शांतपणे समितीच्या कामावर लक्ष देऊन महत्वाच्या मुद्याचा मसुदा तयार करून काही अंशी प्रमाणात न्याय देण्याचा प्रयत्न केला यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे अभिनंदन.. सोबत समितीचे अध्यक्ष अहिल्यानगर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ही मनापासून अभिनंदन… पुढील काळात सरकार हे सर्व शब्द पाळेल अशी अपेक्षा वाटते. तूर्तास मराठा समाज आणि सरकार दोघांच ही मनापासून अभिनंदन … राहुल शिंदे पाटील यांनी पारनेर तालूक्याच्या वतीने केले.