भुसावळ:-म्युनिसिपल हायस्कूल येथे माजी विद्यार्थिनींचा सन्मान.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
म्युनिसिपल हायस्कूल येथे माजी विद्यार्थिनींचा सन्मान.
भुसावळ – म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ शाळेची माजी विद्यार्थिनी, व आज नेरळ( मुंबई ) रेल्वे पोलीस स्टेशन, येथे पोलीस इन्स्पेक्टर (PI) या उच्च पदावर असणाऱ्या कुमारी जयश्री पुरुषोत्तम पाटील. यांनी आज आपल्या शाळेला सदिच्छा भेट दिली.
त्याप्रसंगी त्यांनी, आपल्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, दहावीला नापास झाल्यावर सुद्धा आपण या पदावर कसे गेलो याबद्दल सांगितले. नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी हार न खाता प्रयत्न करून पुढे जायला पाहिजे, नापास होणे ही यशाची पहिली पायरी आहे, व नंतर प्रयत्न करून पास होणे ही आपल्या जीवनाचे अनुभवाची पहिली पायरी आहे असं त्यांनी आपल्या भाषणामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना सांगितले.
शाळेतर्फे म. मुख्याध्यापक एस.जी. मेढे यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी रेल्वेमध्ये पीआय असलेल्या कुमारी जयश्री पाटील अतिशय भावुक झाल्या.शाळेतील शिक्षिका संध्या धांडे , ज्योती शिरतुरे, यांनी छोटेखानी आपले मनोगत व्यक्त केले,
अध्यक्षीय भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री एस जी मेढे, सर यांनी जयश्री मॅडम यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लहानपणी त्या अतिशय चंचल आणि हुशार होत्या, परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्या दहावी नापास झाल्या परंतु त्यांनी आपला मार्ग बदलवला नाही किंवा हार खाल्ली नाही . रेल्वेत पोलीस कॉन्स्टेबल च्या जागा निघाल्या नंतर त्यांनी पहिलाच नोकरीचा अर्ज भरला आणि त्या पहिल्याच अर्जामध्ये त्यांची निवड सुद्धा झाली. नोकरी लागल्यावर सुद्धा त्यांनी आपले शिक्षण चालूच ठेवले त्या पदवीधर झाल्या. आणि आज मुंबईला नेरळ येथे उच्च पदावर पी.आय. म्हणून काम करीत आहे. घरची हलाखीची परिस्थिती असून सुद्धा परिस्थितीवर मात करून. आज त्या उच्च पदावर आहेत. पण त्या मागचे मोठे कारण म्हणजे माणसाची मेहनत. अभ्यास आणि सहनशीलता. या गोष्टी होत. विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या जीवनात या गोष्टी बाळगल्या तर ते सुद्धा जयश्री मॅडम सारखे उच्च पदाला पोहोचू शकतील असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री नरेंद्र राठोड सर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.