वाई:-बाल विठ्ठल मंडळाच्या आयुष्यमान भारत कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
बाल विठ्ठल मंडळाच्या आयुष्यमान भारत कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
बाल विठ्ठल गणेशोत्सव मंडळ वाई शहरातील एक अग्रगण्य व जुने मंडळ आहे.जुन्या काळात चलचित्र देखावे सादर करून तसेच बदलत्या काळानुसार विविध ऐतिहासिक, पौराणिक,सामाजिक विषयावर जिवंत देखावे सादर करून वाईकर रसिकांचे मनोरंजन केलेच व समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे कामही केले.
यावर्षी मात्र मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या अंतर्गत पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत योजना कार्ड काढून देण्यात आले.यामुळे नागरिकांना गंभीर आजारांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळू शकणार आहे.मंडळाच्या या अभिनव उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावर्षी मंडळामार्फत आयुष्यमान भारत कार्ड शिबिर, मोफत आरोग्य शिबिर,समाज प्रबोधनपर व्याख्याने, वृक्षारोपण, रेकॉर्ड डान्स स्पर्धा,नेत्र तपासणी यासारखे समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आजवर मंडळ नेहमीच समाजसेवेत अग्रेसर राहिले आहे. या सर्व उपक्रमांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.या सर्व उपक्रमांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.