श्रीरामपूर:-विश्वकर्मा समाजासह बारा बलुतेदार जाती पोटजातींना आरक्षण लागू करा . शंकर चुरामले यांनी केली नितीन गडकरींशी चर्चा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
विश्वकर्मा समाजासह बारा बलुतेदार जाती पोटजातींना आरक्षण लागू करा . शंकर चुरामले यांनी केली नितीन गडकरींशी चर्चा.
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणातून पारंपारिक विश्वकर्मा समाजासह बारा बलुतेदारांना स्वतंत्र ९ टक्के आरक्षण देण्यात यावे . जस्टिस रोहणी आयोग लागू करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन विश्वकर्मा बारा बलुतेदार मुख्य संयोजक संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शंकर चुरागले यांनी खासदार व केंद्रीय सहक परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन चर्चा केली परंपरागत विश्वकर्मा समाजासह अठरापगड बारा बलुतेदार समाजाला आजपर्यंत ओबीसीच्या २७ टक्के आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही २०१७ मध्ये गठित जस्टिस रोहणी आयोगाकडे मुलाखतीसाठी त्यांना बोलाविल्या नंतर त्यांनी विश्वकर्मा बारा बलुतेदार समाजाचे आर्थिक शैक्षणिक सामाजिक व राजकीय मुद्दे मांडले . जस्टिस रोहणी आयोगाने देशात सर्व्हे केला त्यात एकून २.६०० जाती ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असून त्यापैकी ५०० जातींनीच फक्त २७ टक्के आरक्षणाचा फायदा घेतल्याचे नमूद केले इतर २.१६६ जाती या ओबीसी आरक्षणा पासून वचिंत व दुर्लक्षित राहिल्याचे संसदेमध्ये जस्टिस रोडणी आयोगाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले
त्यानंतर ओबीसीच्या आरक्षणातून अ ब क ड असे चार विभाग करण्यात आले . व त्याला २०२२ मध्ये मंजुर केले वंचित आणि विकासापासून दुर्लाक्षित विश्वकर्मा समाजासह बारा बलुतेदारांना स्वतंत्र ९ टक्के आरक्षण मंजुर करण्यात आले . परंतु काही ओबीसी संघटनांकडून आले ! परंतु काही ओबीसी संघटनांकडून विरोध झाल्याने या आयोगाला गुंडाळून ठेवण्यात आले. त्यामुळे विश्वकर्मा समाजासह बारा बलुतेदार समाजावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. यासाठी केंद्र सरकारने त्यांची आयोग लागू करावा आणि ९ टक्के आरक्षण द्यावे.अशी विनंती शंकर चुरागले यांनी नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनातून केली.शिष्टमंडळात सर्वश्री गजानन देऊळकर सुधाकर सरोदे, हरीश विश्वकर्मा, वसंत सालवनकर अरुण पाटमासे,मुकुल कळसाईत तेजराम बोरेकर, मधुकर खोंडेकर आदी उपस्थित होते.