पुसेसावळी:-(लांडेवाडी) -शिक्षण परिषदेतून शिक्षकांच्या ज्ञानाचे दृढीकरण होते :अरुण पाटील.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शिक्षण परिषदेतून शिक्षकांच्या ज्ञानाचे दृढीकरण होते :अरुण पाटील.
पुसेसावळी (लांडेवाडी):- लांडेवाडी येथे आज शिक्षण परिषद आज आयोजित केली होती.यावेळी शिक्षण परिषदेतून शिक्षकांना आपल्या ज्ञानात भर पडत असून त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यास मदत होते. असे प्रतिपादन शिक्षण विस्ताराधिकारी अरुण पाटील यांनी केले.केंद्रसमूह कळंबी अंतर्गत खटाव तालुक्याचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जि.प.शाळा लांडेवाडी येथे ऑगस्ट महिन्याची शिक्षकन परिषद संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.शिक्षन परिषदेचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती सुपले यांनी केले. शिक्षण परिषदेत खालील विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले
🎯 निवडक विषय सादरीकरण:
1️⃣ नवोपक्रम व कृति संशोधन
👤 श्री. खैरमोडे सर –
वडी हायस्कुल वडी
2️⃣ निपुण महाराष्ट्र अभियान
👤 सौ मंदाताई शिंदे शाळा जि. प. शाळा पुसेसावळी नं 1
3️⃣ इन्स्पायर ॲवार्ड नोंदणी
👤 श्री. के डी. जाधव –
श्रीगिरीजाशंकर विद्यालय रा कुर्ले
4️⃣ अध्ययन निष्पत्ती आधारीत मुल निहाय नियोजन
👤 सौ. अनिता खाडे – जि. प. शाळा, रा कुर्ले
5️⃣ शैक्षणिक पालक सभा-
श्री शरद माळवे
जि प शाळा त्रिमली
6️⃣ केंद्रस्तरावरील गरजांबाबत चर्चा
श्री.धनाजी थोरवे केंद्र संचालक कळंबी,
कळंबी केंद्राचे केंद्र प्रमुख धनाजी पवार यांनी यावेळी कळंबी समूहातील शाळांमध्ये घेण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. तसेच प्रशासकीय बाबींवर चर्चा केली. यावेळी कळंबी केंद्रसमूहातील सर्व शाळाचे शिक्षक उपस्थित होते आभार राजेंद्र फडतरे यांनी मानले. व शिक्षण परिषदेची सांगता झाली.