फलटण:-गिरवी निरगुडी भागात श्री गणेशाचे जल्लोषात स्वागत.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
गिरवी निरगुडी भागात श्री गणेशाचे जल्लोषात स्वागत.
फलटण( गिरवी ):-फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील गिरवी निरगुडी सासकल दुधेबावी धुमाळवाडी बोडकेवाडी जाधववाडा भाडळी तिरकवाडी जावली आंदरुड मिरढे सोनवडी विचुंर्णी मांडवखडक उपळवे वेळोशी सावंतवाडी ताथवडा ढवळ वाखरी दालवडी या ८४ गावातील गणेश मंडळांनी गणेशाचे स्वागत जल्लोषात केले.गणेशोत्सव सुरवात पाऊस पाणी पिक पाणी परिस्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांनी धुमधडाक्यात केली आहे.वाजतगाजत गणरायाच्या स्वागतासाठी घरोघरी जय्यत तयारी केली होती तर गणेश मंडळांनी गावोगावी आकर्षक गणेशमूर्ती घेऊन ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून ग्रामप्रदिक्षणा करत गणेशाची स्थापना केली.
ग्रामीण भागातील गिरवी निरगुडी सासकल दुधेबावी धुमाळवाडी बोडकेवाडी जाधववाडा भाडळी तिरकवाडी जावली आंदरुड मिरढे सोनवडी विचुंर्णी मांडवखडक उपळवे वेळोशी सावंतवाडी ताथवडा ढवळ वाखरी दालवडी परिसरातील गोरगरीब श्रीमंत बागायतदार शेतकरी शेतमजूर व्यावसायीक यांनी घराघरात व गणेश मंडळांनी गावोगावी आप आपल्या गल्लीतील आळीतील भागातील गणेशोत्सव विद्युत रोषणाई आकर्षक मंडम सजावट सामाजिक ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक राष्ट्रीय एकात्मता वृक्षारोपण वृक्षसंवर्धन पर्यावरण विषयक देखावे तयार करण्यासाठी गणेश मंडळांच्यात चढाओढ लागली असल्याचे दिसून येते आहे.
गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करणे बंधनकारक व आवश्यक असताना ग्रामीण भागात मात्र याबाबत जागृती दिसून येते नाही.पोलिस विभाग, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांनी गणेश मंडळांना गणेशोत्सव काळात धर्मादाय आयुक्त कार्यालयाला नोंदवा करणे व वीज वितरण कंपनीकडून तात्पुरती वीज पुरवठा सोय रितसर करण्यासाठी गणेश मंडळांच्यात प्रबोधन करणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळे सर्रास वीज चोरी करुन विद्युत रोषणाई करतात परंतु दुर्दैवाने जर दुर्घटना घडली तर मोठी आपत्ती घडू शकते.यासाठी गावोगावच्या ग्रामपंचायत, पोलिस पाटील व वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी अधिकारी यांनी पुढाकार घेऊन वीज पुरवठा सुरक्षीत व रितसर होईल यासाठी प्राधान्याने गंभीरपणे काम करणे आवश्यक आहे.
ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण होणार नाही यासाठी गणेश मंडळांनी गावोगावी शासनाच्या धोरणानुसार व नियमावली नुसार गणेशोत्सव साजरा केला तर गणेशोत्सव आनंददायी वातावरणात साजरा होईल.
ग्रामीण भागातील अनेक गणेश मंडळांनी सामाजिक प्रबोधनाचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
अगरबत्ती तेल वात दिवा कापूर खिरापत मोदक दुर्वा फुले पुष्पहार यांची विक्री तेजीत आली आहे.ग्रामीण भागातील बाजारपेठेचा अंदाज घेतला तर आर्थिक उलाढाल वाढली असून दुकानदार व्यवसायिक विक्रेते यांची विक्री तेजीत चांगली होत असल्याने यंदाचा गणपती बाप्पा आर्थिक प्रगतीचा आलेख चढता ठेवणार आहे असे स्पष्ट संकेत बाजारपेठेत मिळत आहेत.