अहिल्यानगर:-श्रीरामपुरमध्ये अचानक अतिक्रमण हटाव मोहीम ! तणाव.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्रीरामपुरमध्ये अचानक अतिक्रमण हटाव मोहीम ! तणाव.
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणांविरोधात नगरपालिकेने पुन्हा एकदा कठोर पवित्रा घेत कारवाई सुरू केली आज सकाळी पासून सोनार गल्ली परिसरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली या कारवाईत अनेक अतिकृमिन दुकाने जमीनदोस्त करण्यात आली अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला व्यापाऱ्यांनी अन्यायाचा आरोप करीत संताप व्यक्त केला पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुकानदाराचा तीन दिवसापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला कोणताही दाद मिळाली नाही अखेर पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम पूर्ण केली बुलडोझर व जेसीबीच्या साहाय्याने दुकाने पाडल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला यावेळी व्यापाऱ्यांनी आक्षेप नोंदवितांना सांगितले की . आमच्याकडे जागेची वैध खरेदी कागदपत्रे आहेत तरीही आमची दुकाने अतिक्रमणात कशी धरली जातात तसेच जर अतिक्रमण हटवायचेच असेल तर छत्रपती शिवाजी रस्त्यापासून मेन रोडपर्यंत असलेले सर्वच अतिक्रमण काढा निवडक कारवाई करण्याचे कारण काय . पालिकेच्या या कारणामुळे सोनार गल्लीत वातावरण तणावग्रस्त झाले होते पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी व्यापारी संताप व्यक्त करत होते या कारवाईनंतर शहरातील इतर अतिक्रमण धारक व्यापाऱ्यांमध्ये ही अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले दरम्यान प्रशासनाच्या या कारवाईने राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत काही नेत्यांनी कारवाईला समर्धन देत अतिक्रमण हटविणे अपरिहार्य असे म्हटले असले तरी काहींनी या कारवाईत निवड पद्धत अवलंबल्याचा आरोप केला त्यामुळे मी कारवाई केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता त्यास राजकीय रंग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.