ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कुडाळ गणात श्री राजेंद्र शिंदे यांच्या उमेदवारीने रंगत.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

कुडाळ गणात श्री राजेंद्र शिंदे यांच्या उमेदवारीने रंगत.

कुडाळ दि: राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या जावळी तालुक्यातील कुडाळ पंचायत समिती गणामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री राजेंद्र रामचंद्र शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जयश्री मोरे, तहसीलदार प्रविण मुदगल आणि निवडणूक निर्णय शाखेचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला . कुडाळ नगरीचे युवा नेते जितेंद्र शिंदे, संजय शिंदे, समीर डांगे, अजीज पठाण, अविनाश शिंदे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष आ. शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मयूर देशमुख व कुडाळ परिसरातील अनेक प्रतिष्ठित कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
जावळी तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये मुद्रांक शुल्क विक्रेते म्हणून श्री राजेंद्र शिंदे यांचा खूप मोठा संपर्क आहे. यापूर्वी पक्षाच्या नेत्यांचा आदेश मानून त्यांनी अनेकदा उमेदवारी अर्ज दाखल करून मागे घेतला होता. त्यांच्यावर नेहमीच अन्याय झाला असला तरी आता कार्यकर्त्यांनीच ही निवडणूक हाती घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
श्री राजेंद्र रामचंद्र शिंदे यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखाना संचालक, कुडाळ विकास सेवा सोसायटीचे पंधरा वर्षे, कुडाळ ग्रामपंचायत सदस्य पाच वर्ष, जावळी व महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक पद भूषवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या श्री राजेंद्र शिंदे यांच्या उमेदवारीने कुडाळ पंचायत समिती गणाची निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठित संबोधली जात आहे. जावळी पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असल्यामुळे या कुडाळ पंचायत समिती गणाला महत्त्व प्राप्त झालेले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button