आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिंधुदुर्ग:-“कणकवलीत कचऱ्याच्या डेपोला भीषण आग – प्लास्टिकमुळे भडकला ज्वालांचा रौद्र अवतार!”
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सिंधुदुर्ग:-“कणकवलीत कचऱ्याच्या डेपोला भीषण आग – प्लास्टिकमुळे भडकला ज्वालांचा रौद्र अवतार!”

सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी शैलेश मेस्त्री
कणकवली येथील नगरपंचायतीच्या गार्बेज डेपोला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागून मोठी खळबळ उडाली. डेपोमधील कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक असल्याने आगीने अचानक भडका घेतला आणि काही वेळातच ती प्रचंड स्वरूपात पसरली.
घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीचा नुकताच दाखल झालेला अग्निशामक बंब दाटीवाटीच्या रस्त्यांमधून मार्ग काढत सुमारे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या तत्पर प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.
मात्र, आग पूर्णपणे विझलेली नसून ती अद्याप धुमसत असल्याने खबरदारी म्हणून अग्निशामक बंब आणि कर्मचारी रात्रभर घटनास्थळीच तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या गार्बेज डेपोमध्ये यापूर्वीही अनेक वेळा आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, इतक्या भीषण स्वरूपातील आग गेल्या काही वर्षांत प्रथमच लागल्याचे सांगितले जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, ही अपघाती घटना आहे की जाणीवपूर्वक लावण्यात आलेली आग, असा सवालही उपस्थित केला जात आहे.




