श्रीरामपूर:-माळेवाडी ग्रामपंचायत मध्ये श्री चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
माळेवाडी ग्रामपंचायत मध्ये श्री चक्रधर स्वामी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
माळेवाडी ( प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी ग्रामपंचायत मध्ये सर्वज्ञ भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म इ .स ११९४ मध्ये गुजरात राज्यातील भडोच ( सध्याचे भरूच ) येथे झाला . त्यांच्या वाडे लांचे नाव विशाळदेव . जे भडोचच्या राजा मल्ल्हे देव यांचे प्रधान होते आणि आईचे नाव माल्हण देवी ( माल्हाईसा ) होते जन्मानंतर त्यांचे नाव हरिपाळदेव असे ठेवण्यात आले . तारुण्यात हरिपाळ देव यांचा विवाह कमळादेवी ( कमळाईसा ) यांचाशी झाला . त्यांनी काही काळ राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घेतला . परंतु नंतर त्यांनी वैराग्य स्वीकारून आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला श्री चक्रधर स्वामी यांनी इ स १२६७ मध्ये महानुभाव पंथ या संप्रदायाची स्थापना केली . त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यांनी महानुभाव पंथाचा प्रसार केला . आजही महानुभाव पंथाचे अनुयायी त्यांच्या शिकवणीचे पालन करतात आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतात श्री चक्रधर स्वामी हे केवळ एक धार्मिक नेते नव्हते . तर ते एक समाजसुधारक तत्त्वज्ञ आणि साहित्यिक प्रेरणास्थान होते . त्यांनी समाजातील अन्यायविरुद्ध आवाज उठवून सर्वसामान्य लोकांना आध्यत्मिक मार्ग दाखवला . त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात एक नवा आध्यात्मिक आणि सामाजिक जागर निर्माण झाला माळेवाडी गावचे संरपच सोपान औताडे . कचरू पाटील औताडे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वमने . रामा वमने . विठ्ठल वमने . आबा औताडे . बाजीराव तारडे . बिजीनाना औताडे . भाऊसाहेब वमने सर . निकम पाटील . सोपान दुबे . प्रशांत मोदी .सारगंधर मोहन . सचिन मोहन मारुती मोहन .बाबुराव गोरे . पत्रकार संदीप पगारे व माळेवाडी तील सर्व ग्रामस्थ व मान्यवर लोक उपस्थित होते.