पारनेर:-शेतकरी प्रश्नावरील रस्ता रोको यशस्वी , पण रुपेश ढवण यांचे आमरण उपोषण सुरूच.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
शेतकरी प्रश्नावरील रस्ता रोको यशस्वी , पण रुपेश ढवण यांचे आमरण उपोषण सुरूच.
शेतकरी , वारकरी , व्यापारी व ग्रामस्थ यांचा मोठा सहभाग.
पारनेर – कांदा भाववाढ , कांदा निर्यात बंदी उठवावी , शेतकरी कर्ज माफी या व इतर शेतकरी प्रश्नांवर आमरण उपोषणाला बसलेले युवा शेतकरी नेते रुपेश ढवण यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पारनेर तालुक्यातील शेतकरी , वारकरी , व्यापारी व ग्रामस्थ यांनी आज रविवार दि . २४ रोजी निघोज गाव बंद ठेवून ३ तास भव्य रस्ता रोको केला , पण युवा शेतकरी नेता रुपेश ढवण यांनी मात्र प्रश्नांची तड लागत नाही , तो पर्यंत आमरण उपोषणाचा निर्धार आजच्या ५ व्या दिवशी कायम ठेवला आहे.
आज रविवारी सकाळी १० वाजता रूपेश ढवण यांची टाळ , पखवाद वाजत व अभंग गात उपोषण स्थळापासून ते ग्रामदैवत असलेल्या श्री मळगंगा मातेचे यथा सांग दर्शन घेतल्यानंतर , निघोज च्या बस स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी , वारकरी , व्यापारी व ग्रामस्थ यांच्या समवेत ३ तास भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला शेतकरी यमुनाबाई पांढरकर , दादा वराळ , बाळासाहेब लंके , रामचंद्र सुपेकर , सदाशिव पठारे , आबाजी भुकन , चेअरमन किरण सुपेकर , गणेश पवार व इतरांनी शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत , प्रसंगी सरकार वर शाब्दिक आसूड ओढले .
यावेळी हभप पवन महाराज तनपुरे भिकाजी पठारे , दौलत सुपेकर , संदीप वरखडे , राजू लाळगे , अप्पासाहेब वराळ व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.सुत्रसंचालन अनिलराव लंके यांनी केले.
चौकट –
प्रमुख मनोगत व्यक्त करताना उपोषण कर्ते व शेतकरी नेते रूपेश ढवण म्हणाले की , हे शेतकरी आंदोलन माझ्यासाठी नाही , तर शेतकऱ्यांसाठी आहे , आता नाही , तर कधीच नाही. आज हा रस्ता रोको , थांबविण्यात येत आहे , पण सरकारने ठोस निर्णय घेतल्याशिवाय माझे आमरण उपोषण थांबणार नाही . हा उपोषणाचा दुसरा टप्पा असून मी या आधी आमदार , खासदारांच्या आंदोलनाला एवढा जनसमुदाय उपस्थित नव्हता , त्या पेक्षा जास्त जनसमुदाय आजच्या या रस्ता रोको आंदोलनाला उपस्थित आहे . कांद्याला एक दिवस तरी सोन्याचा भाव मिळेल. शेतकरी जगला , तर च सर्व व्यवसाय चालतील , त्यामुळे शेतकऱ्यांसाठी माझा हा लढा असाच पुढे ही सुरू राहणार आहे , असा निर्धार ही ढवण यांनी व्यक्त केला.
[ चौकट –
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ . भास्करराव शिरोळे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत राज्य सरकारवर टीका केली .
शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिलराव शेटे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत शासकीय अधिकाऱ्यांनी या आंदोलना कडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली .
तर पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उनवणे यांनी सरकारच्या वतीने लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात दिलेले आश्वासन न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त करत रुपेश ढवण यांच्या या आंदोलनाची दखल घ्यायला हवी असा मुद्दा मांडत , कांदा निर्यात धोरण सुरू करून शेतकऱ्यांना शेतीसाठी कमीत कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे.प्रगतशिल शेतकरी महेंद्र पांढरकर यांनी सरकारचे शेतकऱ्यांच्या बद्दल कसे चुकीचे धोरण आहे , याचा लेखा जोगा मांडला.