श्रीरामपूर:-लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज/ हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे
श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर
लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या लॉज/ हॉटेल चालकांवर कायदेशीर कारवाई.
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही बालकावर अर्थात अठरा वर्षाखालील कमी वयाच्या बालकावर कोणत्याही स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाला असेल तर असा लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती हा आरोपी असतो.
परंतु याच कायद्यातील काही कलमानुसार असा अत्याचार करणे सोपे होईल अशा स्वरूपाची मदत करणारा देखील सह आरोपी असतो व त्यालाही मुख्य आरोपी इतकीच शिक्षा असते. याचाच अर्थ अशा स्वरूपाच्या अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक अर्थात हॉटेलचा,लॉजचा मालक/ चालक,कॅफे चालक/ मालक इत्यादी देखील या कायद्यानुसार आरोपी असतात व त्यांना देखील लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी इतकीच अर्थात दहा वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा असते.
या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशन येथे बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीने लैंगिक अत्याचारासाठी दोन वेगवेगळे लॉजचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या दोन्हीही लॉज /हॉटेल चालक यांना सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी करण्यात आले आहे.
श्रीरामपूर विभागात अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या अंतर्गत एकूण 17 पोलीस स्टेशन येतात. या सतरा पोलीस स्टेशनमध्ये बाल लैंगिक अत्याचाराखालील दाखल व तपासावर असणाऱ्या गुन्ह्यांची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये जर कोणी हॉटेल/ लॉज चालक, मालक याने निष्काळजीपणे संबंधित पीडित मुलगी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील आपले हॉटेल किंवा लॉज उपलब्ध करून दिला असेल तर त्यांना देखील गुन्ह्यांमध्ये सह आरोपी करण्यात येणार आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
तसेच यापुढे अशा स्वरूपाच्या दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये जर हॉटेल किंवा लॉजचा,कॅफेचा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित हॉटेल चालक-मालक, कॅफे चालक -मालक, लॉज चालक-मालक यांना देखील सह आरोपी करण्यात येईल.
त्यामुळे सर्वच हॉटेल लॉज चालकांना सूचित करण्यात येते की आपल्या हॉटेलमध्ये, लॉज मध्ये येणाऱ्या व्यक्तींची विहित नमुन्यातील रजिस्टर मध्ये नोंद घ्यावी.त्यांच्या वयाची पडताळणी करावी व यासंबंधीचा पुरावा आपल्या अभिलेखावर ठेवावा. किरकोळ स्वरूपाच्या आर्थिक फायद्यासाठी वरील सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल…
श्रीरामपूर विभागामध्ये संगमनेर,लोणी, कोपरगाव ,सोनई त्याचप्रमाणे अन्य शहरांमध्ये मोठी शैक्षणिक संकुले आहेत. त्यामध्ये संपूर्ण राज्यभरातून मुले मुली शिक्षणासाठी येत असतात. त्यामध्ये बहुतांश विद्यार्थी विद्यार्थिनी हे अल्पवयीन असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वरील प्रमाणे बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी आपले लॉज,हॉटेल उपलब्ध करून देणाऱ्या चालकांवर,मालकांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचेअप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.