पुणे:-ग्लोबल फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्कार 2025.
पत्रकार अनिल जाधव वाई तालुका महासचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
ग्लोबल फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय ग्लोबल स्टार पुरस्कार 2025.
रविवार दिनांक 24/8/25 रोजी संपन्न झाला.यात प्रमुख पाहुणे अध्यक्षा.सौ. रूपालीताई चाकणकर (महाराष्ट्र राज्य महिला आयोग) कार्यक्रमांचे उद्घाटक माननीय श्री. विजय नाईकल सर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका ,प्रमुख पाहुणे माननीय श्री युवराज बेलदरे (नगरसेवक साहेब) माननीय सौ. प्रियांका निकम (पोलीस उपनिरीक्षक भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन) माननीय श्री रुपेश टाकळकर साहेब (डायरेक्टर जॉयझील इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमाचे निमंत्रक विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था ग्लोबल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व आयोजक कमिटी सत्यजित माने, देशमुख सर, शशिकांत कोचळे सर, सरला नंदू पाटील यांनी प्रस्तावना व आभार मानले. आपल्या महाराष्ट्रातील पवित्र भूमीत साहित्यिक सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक इत्यादी विविध क्षेत्रात आपले अतुलनीय कार्याचा ठसा उमटून प्रतिभावना व्यक्तींचा सन्मान व गौरव करण्यात आला. सर्व महाराष्ट्रातून 70 एक पुरस्कार देण्यात आले. त्यातील RPS च्या वाई तालुका उपाध्यक्षा सारिका ननावरे व सौ प्रीती वखारकर यांना गौरव पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह लोहिया नगर पुणे येथे झाला. विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर त्यात पुणे येथील डॉक्टर गुनेश भाटी कशवी चे ओनर श्री गिरीश वैद्य, सौ गुणवंती गिरीश वैद्य व स्माईल लॅबचे ओनर श्री अनिल जाधव तसेच RPS स्टार NEWS च्या वाई तालुका अध्यक्षा सारिका गवते व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत झाला.