कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेने सभासदांचा उत्साह शिगेला…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत

प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेने सभासदांचा उत्साह शिगेला…

सातारा दि: ज्ञानदानाचे काम करणाऱ्या गुरुजनांची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला शिक्षक सभासदांनी चांगले वातावरण दाखवून दिले. यामुळे सभासदांचा उत्साह शिंगेला पोहोचला.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या इतिहासात प्रथमच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदाची धुरा महिला शिक्षिका चेअरमन श्रीमती पुष्पलता बोबडे यांनी समर्थपणाने पार पाडली. त्यांना माझी चेअरमन किरण यादव, संघटनेचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष रणवरे यांच्यासह अभ्यासू सभासद व पदाधिकाऱ्यांचे मोलाची साथ लाभली. चेअरमन श्रीमती बोबडे शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेच्या सुरुवातीलाच दमदार भाषण केले .बँकेच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. त्यानंतर विषय वाचनामध्ये सेवेतील मयत कर्जदार सभासदांचे वारसांना बँकेचे विविध मदत निधीतून सध्या २०.१० लाख मदत दिली जाते त्यामध्ये वाढ करून ती ३०.१० लाख देण्याचा निर्णय घेतला गेला. त्याचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. सभेला उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे विरोधकांची हवाच निघून गेली. त्यामुळे अखेर शेवटच्या क्षणी त्यांच्या काही समर्थकांनी हातात फलक घेवून निषेध नोंदवत घोषणाबाजी सुरु केली. त्यांना निषेध करण्यापूर्वी प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाने त्यांच्या प्रश्नांना योग्य अभ्यास पूर्ण मांडणी करून उत्तरे देवू असे सांगितले होते.
चेअरमन पुष्पलता बोबडे, व्हाईस चेअरमन संजीवन जगदाळे, संचालक ज्ञानवा ढापरे, नितीन काळे, निशा मुळीक, महेंद्र जानुगडे, विशाल कणसे, नितीन राजे, तानाजी कुंभार, विजय शिर्के, संजय संकपाळ, नितीन फरांदे, विजय ढमाळ, शशिकांत सोनवलकर, राजेंद्र बोराटे, नितीन शिर्के, सुरेश पवार, नवनाथ जाधव, शहाजी खाडे, विजय बनसोडे तसेच सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला चेअरमन पुष्पलता बोबडे यांनी दमदार असे भाषण करत पुन्हा विषय वाचनाला सुरुवात केली. संचालकांनी विषय वाचन करुन त्यांच्या विषयांना अनुमोदनही दिले जात होते.
एकेक विषय मंजूर करण्यात आला. त्यानंतर सभेचा समारोप करण्यात आला.
चेअरमन सौ पुष्पलता बोबडे म्हणाल्या, सभासदांची मागणी विचारात घेवून संचालक मंडळाने विविध कर्जाचे व्याजदरात कपात करून सभासदांना दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. बँकेने सभासदांचे आजारपणाची मदत, मयत सभासद मदत, विविध प्रकारचे अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा व नफा पातळी योग्य प्रमाणात राहण्यासाठी उपाययोजना केल्यामुळे, तसेच खर्चातील काटकसर यामुळे ३१ मार्च२०२५ अखेरीस रू. ७ कोटी ७५ लाख ढोबळ नफा तर रू.२ कोटी ९८ लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. संचालक मंडळाने सभासदांसाठी खास सवलतीच्या व्याजदरात नवीन कर्ज सुविधा केलेल्या आहेत, असे सांगितले.
व्हाईस चेअरमन संजीवन जगदाळे यांनीही तसेच नेट बँकींग व्यवहाराद्वारे प्रत्येक ग्राहकास एका दिवशीची मर्यादा २ लाख इतकी केलेली आहे.येणाऱ्या स्पर्धेच्या काळात सहकाराचे तत्व जपत बँकेचे सभासद आणि खातेदार यांची विश्वासार्हता जपून शिक्षक बँकेचा नावलौकिक उत्तरोत्तर वाढविण्यासाठी संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहून सभासदांचा विश्वास सार्थ ठरवेल असे मत व्यक्त केले. विषय पत्रिकेचे वाचन बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अण्णासाहेब भोसले यांनी केले. त्यांनी प्राथमिक शिक्षक बँकेच्या वाटचालीचा व प्रगतीचा आढावा घेतला.
सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेला खेळीमेळीच्या वातावरणाचे निर्मिती करणारे माजी चेअरमन सिद्धेश्वर पुस्तके, किरण यादव, बलवंत पाटील शिक्षक नेते उदय शिंदे, विश्वंभर रणनवरे यांच्यासोबत बसलेले होते. दरम्यान, त्यांच्या आरोपाच्या पत्रकावर पत्रकांनीच तेथेच उत्तर दिले गेले. हे सर्व पूर्वनियोजित असल्यामुळे सभासदांनी दोन्ही बाजू समजून घेतल्या.
शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बँकेच्या सत्तेत्त असलेले आणि विरोधक असे सगळेच नेते अपवाद वगळता एकत्र पहायला मिळत होते. कोणताही वाद होवू द्यायचा नाही. यासाठी काहींनी अगोदरच फिल्डिंग लावली होती. त्यात त्यांना यश मिळाले. त्यांच्याकडून अगोदरच्या बैठकीत नियोजन केल्यानुसार सभा पार पडली. त्यामध्ये शिक्षक संघटनेचे नेते उदय शिंदे, विश्वंभर रणनवरे, दीपक भुजबळ, सिद्धेश्वर पुस्तके, विठ्ठल माने, चंद्रकांत यादव यांचीही सभेच्या शेवटपर्यंत उपस्थिती होती. त्यांचं बारकाईने सर्व शिक्षक सभासदांकडे लक्ष होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडवण्याचे धाडस शिक्षक सभासद व बँकेत आलेल्या काही न करता आले नाही. याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक
सभा संपल्यानंतर काही सभासद जेवणाकडे वळाले तर काही सभासद हॉलमधून बाहेर पडले तर काही तेथेच बोलत थांबले होते . श्रावण संपल्यामुळे अनेक शिक्षकांनी आपल्या आवडीच्या जेवणास ताव मारला. प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेला शिक्षकांची शिस्त पाहण्यास मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षक बँक कात टाकत असल्याचे दिसले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button