साताऱ्यात भाजपविरोधी घड्याळाने साधली अचूक वेळ.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
साताऱ्यात भाजपविरोधी घड्याळाने साधली अचूक वेळ.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर जुनी टीम घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजप विरोधी अचूक घड्याळाची वेळ साधली आहे. यामध्ये नेमकं किती यश मिळते? हे पाहणे नवलाईचे ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यात १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर युवकांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याची शक्ती मिळते. मात्र, राजकीय पक्ष प्रवेशाला वय व अनुभवाची अट नसल्यामुळे काहीजण पाच पक्ष बदलून सहाव्या पक्षात प्रवेश करण्यामध्ये उत्सुक असतात. त्यांचे जोरदार स्वागत स्वतःच करावे लागते. हा भाग वेगळा असला तरी सातारा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची अंतिम रचना जाहीर झालेली आहे. पाटण सात, कोरेगाव सहा, माण पाच, जावळी तीन, खटाव सात ,वाई चार ,खंडाळा तीन, महाबळेश्वर दोन, कराड बारा, आणि सातारा आठ असे जिल्हा परिषद गट आहे. त्याचबरोबर पंचायत समिती गण त्याच्या दुपटीने आहेत. यामध्ये महिला, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय यांना घटनेनुसार आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे राजकीय रंगत वाढण्याची शक्यता असली तरी आरक्षण जागेवर राजकीय पक्षाची भूमिका व आरक्षण आंदोलनात न दिसणारे सुद्धा घुसखोरी करू शकतात का ? याकडे आता निष्ठावंत व स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
लोकशाहीने राजकीय पक्ष बदलण्याचा अधिकार दिले आहे. या अधिकाराचा पुरेपूर वापर करून आतापर्यंत ऐंशी टक्के त्याचा लाभ घेतला आहे . उर्वरित वीस टक्के लाभ भविष्यात घेतला जाण्याची ही परवानगी आहे. हे नाकारून चालणार नाही. या पक्ष बदलू लोकांमुळे निष्ठावंत नेत्यांनी जाब विचारणे गरजेचे आहे. अन्यथा आली सार्वत्रिक निवडणुका…. कर पक्ष प्रवेश…. असे नवीन लाट निर्माण होणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये भाजपने चांगलीच वैचारिक मुसंडी मारली आहे. परंतु, आता भाजपमधून काही जण राष्ट्रवादी म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या महायुतीत येण्यास सुरुवात झाली आहे. वाटीतले ताटात सांडले तरी त्याचाही लाभ घेता येतो. जावळीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे गट, वाई मध्ये भाजप विरोधी राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गट आणि माण मध्ये भाजप विरोधी अजित पवार गट कराड दक्षिण मध्ये भाजप विरोधी अजित पवार गट असा चौकारा मारण्यात आलेला आहे. ये अंदर की बात है!!!! अजितदादा हमारे साथ है!!!! यामुळे चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहेत.
याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न भविष्यात होणार आहे. शेवटी प्रस्थापित मंडळींना राजकीय पक्ष जोपर्यंत पायघड्या घालत आहेत .तोपर्यंत त्यांचं कुणीही वाकडं करू शकत नाही. जे वाकडे करण्याचा प्रयत्न करतील. त्यांना खड्यासारखे बाजूला केले जाईल. हा राजकीय नियम सातारा जिल्ह्यालाही लागू आहे. त्यामुळे भविष्यात घड्याळाची अचूक वेळ साधून भाजपचे कमळ निस्तेज करण्यास हालचाली सुरू झाल्याचे मानण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात दोन महत्त्वाचे पक्षप्रवेश झाले असले तरी राजकीय नेत्यांनी त्याची फारशी दखल घेतली नसल्याचे दिसून आले आहे.