फलटण तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामाला वेग आला.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
फलटण तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामाला वेग आला.
फलटण:- फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातून पावसाने उघडीप दिल्याने शेतीच्या कामाला वेग आला असून मजूरांचा तुटवडा निर्माण झाला आहे.असे चित्र दिसून येत आहे.
पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या बाजरी मुग मटकी चवळी वाटाणा पावटा घेवडा मका इत्यादी पालेभाज्या व फळभाज्या व पिकांना पावसामुळे जीवदान मिळाले आहे.काही गावांत, भागात जास्त पाऊस सलग झाल्यामुळे मुळकुज खोडकुज अळी किटक हुमणी यांचा प्रादुर्भाव झाला आहे.शेतकरी किटकनाशके व जैविक औषधांची फवारणी करत आहेत.तर पावसाच्या वेळेत पडत्या पावसात बाजरीला युरीया टाकताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.युरीया जादा दराने व खते लिंक करुन सर्रास खते औषधे बी बीयाणे दुकानदारांनी शेतकऱ्यांची युरीयासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केल्याची चर्चा आहे.
शेतात पावसामुळे गवत वाढले आहे त्यामुळे भागंलणीच्या कामासाठी मजूरांची टंचाई व धावपळ ग्रामीण भागात दिसून येते आहे.गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे उरकण्याची घाई झाली आहे.
वाढती महागाई,खते औषधे बी बीयाणे शेती मशागत यांचा वाढता खर्च आणि निसर्गाच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अशी प्रतिक्रिया कर्जबाजारी शेतकरी देत आहेत.