सातारा:-आज होणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेकडे सर्वांचे लक्ष ..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
आज होणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेकडे सर्वांचे लक्ष ..
सातारा दि: सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण
सभा रविवार दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी१ वाजता मोरया लॉन्स मंगल कार्यालय, दत्तनगर,तेजस पेट्रोल पंपा शेजारी सातारा – रहिमतपूर रोड
कोडोली, सातारा येथे होत आहे.
बँकेच्या चेअरमन सौ.पुष्पलता बोबडे यांचे अध्यक्षतेखाली व व्हॉईस
चेअरमन श्री. संजीवन जगदाळे व सर्व संचालक सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आण्णासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये समिती व संघ व इतर शिक्षक संघटना यांच्यामधील अंतर्गत मतभेद आणि आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले. त्यानंतर चेअरमन व्हॉइस चेअरमन पदाची निवड ही झाली. या निवडणूक प्रक्रियेच्या वेळेला काही शिक्षक संघटनेच्या नेत्यांना बाजूला करण्यात आले.
प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक समिती आणि इतर शिक्षक संघटना यांच्यामध्ये तात्पुरते होईना पण मनोमिलन झाले होते. हे काहींना रुचले नाही. त्यांनी उघडपणाने बंड केले असले तरी व्यवहारी ज्ञानापेक्षाही वही पुस्तके ज्ञान वरचढ ठरले आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांबाबत संघटना नेहमीच आक्रमक भूमिका घेत असते. परंतु सध्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांबाबत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे उघडपणे बोलले जात आहे. या पाठीमागे नेमका मेंदू कुणाचा आहे ? दिव्यांग प्रमाणपत्रासाठी काही शिक्षकांच्या पर्यंत प्रमाणपत्राची संजीवनी बुटी कुणी दिली? याचीही यानिमित्त चर्चा सुरू झालेली आहे.
वास्तविक पाहता प्राथमिक शिक्षक बँकेच्या नोकर भरती बाबत न्यायालयात लढा देणाऱ्या नेत्यांना दिव्यांग शिक्षक प्रमाणपत्र बाबत कायदेशीर बाजू मांडण्यासाठी पुरेसा अवधी आहे. जे सत्य आहे. ते कधीही लपवता येत नाही. परंतु जे अर्धसत्य आहे. ते पूर्ण सत्य उघडकीस आणण्यासाठी सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे.
शेवटी प्राथमिक शिक्षक बँक ही शिक्षकांसाठीच असते. त्यामुळे शिक्षकांच्या समस्याही सोडवणे गरजेचे आहे. फक्त आर्थिक समस्या आणि बँक अशी आघाडी किंवा युती करणे. हे काही सभासदांना पटले नाही. त्यामुळे वार्षिक सभेला याबाबत मोठ्या प्रमाणात प्राथमिक शिक्षकांचा असंतोष दिसून येईल का? हा सुद्धा या निमित्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नेहमीच प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सभा उरकली जात असते. दावा – प्रतिदावा केला जातो. पण, यंदा पावसाळ्यामध्ये किती सभासद हजर होतील? हे सांगणे कठीण झाले आहे.