कराड:-श्री शिवाजी विद्यालय कराड येथे श्री गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
श्री शिवाजी विद्यालय कराड येथे श्री गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न.
कराड:- शालेय विद्यार्थी गणेशोत्सव निमित्ताने श्री शिवाजी विद्यालय, कराड ,येथे क्ले माती व शाडूची माती यांच्यापासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादात संपन्न झाली.
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी श्री गणेशाच्या आकर्षक व सुबक मूर्ती तयार केल्या.
विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला कल्पकतेला हा उपक्रम नाविन्यपूर्ण आहे,अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या अंगी नवनिर्माणशीलता बाणते ,असे मुख्याध्यापक श्री.टी.डी. जाधव यांनी याप्रसंगी सांगितले.
विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ संकपाळ पी. एस., श्री सुकम जी.डी .सौ यादव व्ही .आर. श्री माळी आर.एस. कु. कोरे जी.आर .श्री शिंदे जे.वाय्. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.