आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-(उंब्रज)-शिक्षणक्षेत्रात ज्ञानरचनावाद एक नवसंजीवनी.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत

शिक्षणक्षेत्रात ज्ञानरचनावाद एक नवसंजीवनी.

 

कराड ( उंब्रज ):-
ज्ञानरचनावाद (Constructivism) म्हणजे शिक्षण आणि ज्ञानाबद्दलची एक प्रक्रिया. यात, विद्यार्थी स्वतःच्या अनुभवांनी आणि कृतीतून ज्ञान निर्माण करतात. शिक्षकांनी
विद्यार्थ्यांना माहिती पुरवण्याऐवजी, त्यांना स्वतःहून शिकण्यासाठी आणि ज्ञान निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे. ज्ञानरचनावाद प्रकल्प माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती भराडे मॅडम यांनी कुमठे बीटात अत्यंत प्रामाणिकपणे यशस्वीपणे प्रभावीपणे अंमलबजावणी केली होती व राज्यातील शिक्षण क्षेत्रात नवी दृष्टी व नवा विचार प्रवाह निर्माण झाला होता.खटाव तालुक्यातील अनेक शाळांमध्ये ज्ञानरचनावाद प्रकल्प राबविण्यात आले.
ज्ञानरचनावादाची काही मुख्य वैशिष्ट्ये:

(१) ज्ञान निर्मिती:
विद्यार्थ्याला माहिती देण्याऐवजी, त्याला स्वतःच्या अनुभवांनी आणि कृतीतून ज्ञान निर्माण करण्याची संधी दिली जाते.

(२) शिकणे ही एक सक्रिय प्रक्रिया:
ज्ञानरचनावादात, शिकणे ही एक सक्रिय प्रक्रिया आहे. विद्यार्थी माहिती प्राप्त करून ती समजून घेतात आणि स्वतःच्या ज्ञानात रूपांतर करतात.

(३) शिक्षक एक मार्गदर्शक:
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माहिती देण्याऐवजी, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना स्वतःहून शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे अपेक्षित आहे.
पर्यावरणाची निर्मिती:
ज्ञानरचनावादी शिक्षणामध्ये, विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्यासाठी आणि ज्ञान निर्माण करण्यासाठी योग्य वातावरण तयार करणे आवश्यक आहे.

✳️ ज्ञानरचनावादाचा उपयोग:

(१) विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग:
ज्ञानरचनावाद विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यास मदत करतो, ज्यामुळे त्यांचे ज्ञान अधिक दृढ होते.

(२) समस्या-समाधान कौशल्ये:
ज्ञानरचनावादाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समस्या-समाधान कौशल्ये विकसित करण्यास मदत होते, कारण त्यांना स्वतःच्या ज्ञानाचा वापर करून समस्या सोडवावी लागते.

(३) सर्जनशीलता आणि विचारशक्ती:
ज्ञानरचनावाद विद्यार्थ्यांना सर्जनशील आणि चिकित्सकपणे विचार करण्यास प्रोत्साहित करतो.

(४) शिक्षणाची आवड:
विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण होते, कारण ते स्वतःच्या ज्ञानात सक्रियपणे सहभागी होतात.
ज्ञानरचनावाद, शिक्षणातील एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आहे, जो विद्यार्थ्यांना सक्रियपणे शिकण्यास आणि स्वतःचे ज्ञान निर्माण करण्यास प्रोत्साहित करतो.

✳️ ज्ञानरचनावादाचे प्रकार : बर्निंग यांनी ज्ञानरचनावादाचे तीन प्रकार सांगितले आहेत.

(१) बोधात्मक ज्ञानरचनावाद : हा प्रकार माहिती प्रक्रियाकरण आणि बौद्धिक प्रक्रियेचे घटक यांच्याशी संबंधित आहे. ज्ञान मिळविणे ही एक अनुकुलनक्षम प्रक्रिया आहे आणि ती विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विचार प्रक्रियेवर अवलंबून असते. हा प्रकार प्याजे यांच्या बोधात्मक विकासाच्या उपपत्तीवर आधारित आहे. वाढीच्या विशिष्ट अवस्थांमध्ये क्रमाक्रमाने प्राप्त झालेल्या बौद्धिक क्षमतांनुसार मूले भोवतालच्या जगाचा अर्थ लावत असतात. त्यानुसार ते सभोवतालच्या जगाला प्रतिसाद देत असतात. यातून मिळणाऱ्या अनुभवातून मुलांच्या मनात क्रमाने नवनवीन बोधात्मक रचना तयार होते. व्यक्तिपरत्वे येणारे अनुभव भिन्न असल्यामुळे तयार होणाऱ्या बोधात्मक रचनाही भिन्न असतात.

प्याजे यांनी मांडलेल्या उपपत्तीवर काही तज्ज्ञांनी टीका केली आहे. त्यामध्ये मानशास्त्रज्ञ मार्गारेट मीड यांनी सांस्कृतिक फरकामुळे विविध मानवी समाजातील मुलांच्या विकसनावर आणि त्यामुळे वर्तनावर होणारा परिणाम लक्षात आणून दिला. आई-वडिल, भावंडे, मित्र, शिक्षक, समाज यांच्याशी होणाऱ्या आंतरक्रियांची दखल प्याजे यांनी घेतली नाही, अशी टीका काही समाजशास्त्रज्ञांनी केली. म्हणून प्याजे यांच्या ज्ञानरचनावादाला वैयक्तिक/बोधात्मक ज्ञानरचनावाद असे म्हटले जाते.

(२) सामाजिक ज्ञानरचनावाद : लेव्ह यांनी सामाजिक ज्ञानरचनावाद या प्रकाराचा पुरस्कार केला. त्यांच्या मते, ‘मुलांच्या विकासात विचारप्रक्रिया व भाषा यांचा फार मोठा वाटा असतो. त्याचबरोबर बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचाही वाटा असतो. या आंतरक्रिया जशा कृतीतून घडतात, तशा संभाषणातूनही घडतात. ज्ञान मिळविण्याची सुरुवात इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या संवेदनातून होत असली, तरी इतरांशी होणाऱ्या भाषिक आंतरक्रियांतून संवेदनाचे अवबोधात आणि अवबोधांचे संबोधात रूपांतर होत असते. त्यावर मानसिक प्रक्रिया घडत असतात. म्हणजे ज्या गटाबरेाबर आंतरक्रिया होते, संवाद होतो, त्या गटात प्रथम ज्ञाननिर्मिती घडते आणि नंतर व्यक्तीच्या मनात संवाद होऊन मग तिथे ज्ञाननिर्मिती घडते’. लेव्ह यांनी ज्ञाननिर्मिती घडताना शिकणाऱ्याच्या इतरांबरोबरच्या तसेच स्वत:च्या मनाशी होणाऱ्या प्रतिक्रियांना दिलेले महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या ज्ञानरचनावादाला ‘सामाजिक ज्ञानरचनावाद’ असे म्हणतात.

(३) मूलगामी ज्ञानरचनावाद : अर्नेस्ट व्हॉन ग्लॅसरफेल्ड हे मूलगामी ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते मानले जाते. त्यांच्या मते, ज्ञान म्हणजे मानवी मेंदूची स्वसंघटनात्मक बौद्धिक प्रक्रिया होय. ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया स्वनियंत्रित असून ज्ञानाचे संकलन करण्याऐवजी ज्ञानाची रचना केली जाते. ज्ञान हे वस्तूनिष्ठ नसून ते जाणून घेणाऱ्याच्या संरचनेवर अधारित असते. यानुसार अर्थ प्रत्येकाच्या मनामध्ये अस्तित्वात असतो. त्याचे संक्रमण होऊ शकत नाही. अर्थ किंवा आकलन अनुभवामुळे मोजक्या शब्दांत मांडता येतो व आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा करता येतात.
ज्ञानरचनावाद प्रकल्प हा शैक्षणिक क्षेत्राला नवसंजीवनी देणारा शिक्षणातील आनंददायी लोकशाही स्वातंत्र्य जपणारा अभिनव विचार आहे.

लेखक
सौ माधुरी सुर्यकांत शिंदे-जाधव
( उपक्रमशील व प्रयोगशील उपशिक्षिका )
जिल्हा परिषद शाळा उंब्रज मुले ता कराड जि सातारा
संदर्भ (आंतर मायाजाल/ ज्ञानरचनावाद विषयक प्रसिद्ध लेख व पुस्तके)

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button